पुणे : कंटेनरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

dead
dead

औंध (पुणे) : मुंबई-बंगळूर महामार्गावर रस्ता ओलांडताना सुतारवाडी जवळ कंटेनरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. इंदूबाई रोहिदास रणपीसे रा. सुतारवाडी (वय 54) असे मृत महिलेचे नाव आहे.

महामार्गाच्या पश्चिमेला रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या एमएच 43 वाय-2350 या कंटेनरने त्यांना धडक दिली असता यात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर चालकाने कंटेनर थोड्या अंतरावर थांबवून पळ काढला. या अपघाताची नोंद हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. औंध येथील  जिल्हा रूग्णालयात इंदूबाई यांना  दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com