महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्‍टर हवेत? वाट बघा..!

Women-issue
Women-issue

प्रसूतीमधील गुंतागुंतीमुळे ‘सिझेरियन’द्वारे प्रसूती करावी लागण्याची संख्या वाढत असून, महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये येणाऱ्या महिलांना त्याची गरज भासत आहे. पण, पावणेदोन हजार गर्भवतींमागे महापालिकेकडे एक प्रसूतितज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. त्यातच पूर्ण वेळ डॉक्‍टर हजर असणे अपेक्षित असले, तरीही वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे अनेक डॉक्‍टर सकाळी आणि सायंकाळी तासभर हजेरी लावून गायब होत असल्याचेही रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

पुणे - महापालिकेच्या ज्या रुग्णालयांमध्ये प्रसूतिगृहे आहेत, तिथे पूर्णवेळ डॉक्‍टर नेमण्याचा आदेश देण्यात आला आहे; पण डॉक्‍टर जागेवर उपस्थित नसल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या गर्भवतींची वेळेत तपासणी होत नाही. इतकेच नव्हे, तर डॉक्‍टरांच्या बेजबाबदारपणाकडे लक्ष वेधून तक्रार केल्यास ‘सरकारी कामात अडथळा आणला’ असे सांगत तक्रार करणाऱ्यालाच दोषी ठरविले जाते, असे अनुभवही सांगण्यात आले. डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी रुग्णालयांमध्ये जागोजागी ‘सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून कायद्यानुसार होणारी कारवाई आणि शिक्षेचे स्वरूप’ याची माहिती देणारे भलेमोठे फलक उभारण्यात आले आहेत.

प्रसूतीचा खर्च 
खासगी रुग्णालयातील जनरल वॉर्डमधील प्रसूतीदर (चार दिवसांसाठी)
सिझेरियन - 65 ते 70 हजार
नैसर्गिक प्रसूती - 40 ते 45 हजार (आकडे रुपयांत)

सर्वसामान्य वंचित
 पावणेसहा हजार कोटी रुपयांचा 
अर्थसंकल्प मांडणाऱ्या महापालिकेकडे 
मोजकेच स्त्रीरोगतज्ज्ञ.
 प्रसूतीसाठी नोंदणी करणाऱ्या २० हजार गर्भवतींवरील 
उपचारांसाठी १० ते १२ प्रसूतितज्ज्ञ.
 रुग्णालयांमधील नवी यंत्रणा, त्याची देखभाल-दुरुस्ती आणि 
रुग्णालयांच्या साफसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; पण प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ नेमण्याकडे दुर्लक्ष का?

सिझेरियनची कारणे
 सुरक्षित प्रसुती, रक्तदाब वाढणे 
आणि मधुमेह
 आईच्या जिवाला धोका (बाळ गुदमरण्याची भीती) 
 प्रसूतीपूर्व सेवेचा दर वाढल्याने सुरवातीपासूनच सिझेरियनचे नियोजन 
 जननमार्ग पुरेसा मोठा असेलच असे नाही, त्यामुळे सिझेरियनचा पर्याय

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्‍यक ती यंत्रणा उभारणार आहे. त्याआधी उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेऊन प्रसूतितज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ नेमण्यात येतील. टप्प्याटप्प्याने सर्व रुग्णालयांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ पुरविण्यात येतील व अन्य सेवाही विस्तारण्यात येतील.
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख

आवाहन
महापालिका रुग्णालयांचा असा अनुभव तुम्हाला आला आहे का? त्यावर प्रॅक्‍टिकल उपाय काय करता येतील, हे तुम्हाला सुचत आहे का? 

आपल्या सूचना फेसबुक आणि ट्विटरवर मांडा 
#pmchealth हॅशटॅगवर
ई- मेल करा webeditor@esakal.com वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com