शब्दरूपात बुरशीचे विश्‍व

शब्दरूपात बुरशीचे विश्‍व

महाबळेश्‍वर येथील ७६ बुरशी, दगडफुलांच्या प्रजातींची माहिती

पुणे - महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या... अन्‌ सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘महाबळेश्‍वर’मध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशी आणि दगडफुलांचे अनोखे विश्‍व आता शब्दरूपात उलगडले आहे. बुरशीतज्ज्ञ डॉ. किरण रणदिवे यांनी ‘फंगी ॲण्ड लायकेन्स ऑफ महाबळेश्‍वर’ या पुस्तकाद्वारे हे विश्‍व जगासमोर आणले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. 

महाबळेश्‍वर येथील ७६ बुरशी आणि दगडफुलांच्या प्रजातींची माहिती या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहे. बुरशी हा निसर्गातील अतिशय महत्त्वाचा, पण कायम दुर्लक्षित राहिलेला घटक. पण निसर्ग आणि पर्यावरण खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर बुरशीबद्दल जाणून घ्यावेच लागेल, असे डॉ. रणदिवे सांगतात.

ते म्हणाले, ‘‘महाबळेश्‍वर परिसरातील जंगलात फिरताना नकळत झाडांच्या खोडावरील, जमिनीवरील किंवा दगडावरील बुरशीकडे नजर जाते. काही बुरशी लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. जमीन फोडून बाहेर येणारी भुईफोड (कॅलव्हॅशिया) ही बुरशी त्यातील महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. मशरूमचे वेगवेगळे प्रकारही येथे आढळतात.’’

जमिनीवर पाच पाकळ्या आणि त्याच्यामधोमध गोलाकार गट्टू आणि त्या गट्टूत बीजाणूंची भुकटी असा ‘जमिनीवरचा तारा’ (म्हणजेच अर्थ तार फंगस) ही देखील महाबळेश्‍वरमध्ये आढळणारी बुरशी वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल. या बुरशीतील बीजाणूंची भुकटी जखमा लवकर भरून येण्यासाठी वापरली जाते, असेही त्यांनी सांगितले.

महाबळेश्‍वर परिसरात ‘हायमेनूकिटी’ ही बुरशी आणि अनेक प्रकारची दगडफुले आढळून येतात. यातील बहुतांश दगडफुलांचा वापर सुगंधी द्रव्ये, औषध निर्मितीसाठी केला जातो. महागड्या अत्तरांत वापरण्यात येणारी ‘उसनिया कॉप्लॉनाटा’, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि कर्करोगावरील उपचारासाठी महत्त्वपूर्ण असणारी ‘गॅनो डरमा चाल्सियम’देखील याच भागात दिसून येते.
- डॉ. किरण रणदिवे, बुरशीतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com