सिध्देश्वर निंबोडी ओढा खोलीकरणाचे काम अंतिम टप्प्यात 

odha
odha

शिर्सुफळ (पुणे) : सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व बारामती अँग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असलेल्या ओढा खोलीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या जलसंधारण कामामुळे ओढ्याची खोली व रुंदी वाढली आहे. तसेच ओढ्याच्या पात्रात घालण्यात आलेल्या माती बांधामुळे लाखो लिटर पाण्याचा साठा होणार आहे तसेच पाणी जमिनीत मुरुन पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.यामुळे ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

बारामती तालुक्यामध्ये सकाळ माध्यम समुहाच्या माध्यमातुन अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरु आहेत. यासाठी अँग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट व बारामती अॅग्रो यांच्या वतीने कामासाठी मशीन उपलब्ध करुण देण्यात आले आहे व सकाळ रिलीफ फंडातुन इंधन खर्च देण्यात येत आहे.सिध्देश्वर निंबोडी येथील तुकाई मंदिर ते मदनवाडी तलावाकडे जाणाऱ्या ओढा खोलीकरणाचे काम यामाध्यमातुन हाती घेण्यात आले होते. यामुळे अतिशय अरुंद व गाळाने माखलेल्या ओढ्याचे रुप बदलत चालले आहे.आता ओढा रुंद व खोल होत चालला आहे.याचा परिणाम आगामी काळामध्ये या भागातील शेतकऱ्यांनी शेती सिंचनसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच याच परिसरात गावच्या शासकिय पाणीपुरवठा योजनेची विहीर तसेच परिसरातील कुपनलिका, खाजगी विहीरी यांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे

याबाबत अॅग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, जि.प.सदस्य रोहित पवार व सकाळ माध्यम समुहाचे ग्रामस्थांच्या वतीने गावच्या सरपंच मनिषा फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, ग्रामसेवक रंजना आघाव, माजी सरपंच किशोर फडतरे, सुनिल उदावंत, संतोष नगरे, पोपट खडके यांच्यासह ग्रामस्थांनी आभार व कामाबाबत समाधान व्यक्त केले  

सकाळची सामाजिक बांधिलकी गौरवास्पद 
दुष्काळाशी सामना करायचा असेल तर प्रत्येकाने पाऊसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवले पाहिजे.तरच पाणी पातळी वाढेल.तसेच दुष्काळ कायमस्वरुपी हटविण्यासाठी जलसंधारण कामे गरजेची आहेत. यासाठी सकाळ माध्यम समुहाची असलेली महत्त्वाची भूमिक गौरवास्पद आहे. 
- रोहित पवार (जिल्हा परिषद सदस्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com