जुनी सांगवीतील तुंबलेल्या चेंबर दुरूस्तीचे काम सुरू

रमेश मोरे
मंगळवार, 12 जून 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्यावर ढोरेनगर येथील ड्रेनेज लाईन चेंबर तुंबल्याने गेली पाच दिवसापासुन मैलामिश्रित पाणी रस्त्यावर होते. यामुळे येथील दोनशे मिटर परिसरात घाण पाणी साचुन रहदारीस अडथळा होत असल्याबाबत ई सकाळ मधुन बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाकडुन येथील दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. 

येथील ओव्हर फ्लो होणारा चेंबर व पाईप बदलण्यात आला आहे. आधीच येथील रस्ता सखल खड्डेमय असल्याने पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने या परिसराला पाणी साचुन तळ्याचे स्वरूप येते. गेल्या पाच दिवसापासुन येथील चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने घाण पाणी गतिरोधकला साचुन राहात होते. सकाळी व रात्री येथे चेंबर मधुन येणारे मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचुन राहील्यामुळे नागरीकांना यातुनच रहदारी करावी लागत होती. 

मंगळवारी सकाळी कामास सुरूवात करण्यात आली आहे. किमान आठ तासात काम पुर्ण होवून बुधवार ता.१३ रस्ता खुला होईल. 
प्रिती यादव, कनिष्ठ अभियंता महापालिका ह प्रभाग. 

Web Title: The work of repairing the chamber of the old Sangavi has started