पुणे मेट्रो | ५० फूट उंचीवरून कामगार पडला, जागीच मृत्यू

Worker dies after falling from fifty feet while working Metro car shed pune
Worker dies after falling from fifty feet while working Metro car shed punesakal

पुण्यात बहुचर्तित मेट्रोचा पहिला टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू झाला. मोदी उद्घाटनाला येणार असल्याने मोठा सोहळा करण्यात आला. मात्र मेट्रोचं संपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेलं नाही.

पहिल्या टप्प्यात सुरू करण्या आलेले स्टेशन अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. तसेच रंगरंगोटीपासून काही कामं अद्याप बाकी आहेत. अशातच मेट्रो कारशेडचं काम सुरू असताना कामगाराचा मृत्यू झाला आहे. (Pune Metro Accident)

Worker dies after falling from fifty feet while working Metro car shed pune
पुणे : स्वारगेट ते कात्रज मेट्रो भुयारी मार्गातून धावणार; मंत्रिमंडळाची मोहोर

५० फूट उंचीवरून पडल्याने या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली. मूलचंद्रकुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.

या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद करण्या आली आहे. त्याने सुरक्षाविषयक साहित्य घातले होते. मात्र ५० फूट वरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com