लेखक रमेश सहस्रबुद्धे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

पुणे - ज्येष्ठ विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे (वय 78) यांचे बुधवारी सायंकाळी येथे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, दोन सुना असा परिवार आहे. 

पुणे - ज्येष्ठ विज्ञानकथा लेखक रमेश सहस्रबुद्धे (वय 78) यांचे बुधवारी सायंकाळी येथे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, दोन सुना असा परिवार आहे. 

सहस्रबुद्धे यांनी आजवर वेगवेगळ्या विषयांवर 76 पुस्तके लिहिली आहेत. अनेक दिवाळी अंकांमध्ये लेखन केले असून, त्यांनी लिहिलेल्या विज्ञान-कुतूहल, प्राणी-पक्षी निरीक्षण, बोधकथा, वैज्ञानिक आणि थोरांचे किस्से प्रसिद्ध झाले आहेत. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांची व्याख्यानमाला प्रदर्शित झाली आहे. टेलिव्हिजन आणि विज्ञानसागरातील दीपस्तंभ या त्यांच्या दोन विज्ञानविषयक पुस्तकांना राज्य पुरस्कार लाभला असून, यातील एकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. गोवा पाठ्यपुस्तक मंडळाने आठवीच्या पुस्तकात त्यांचा धडा समाविष्ट केला होता. "विज्ञान युग' या पुण्यात प्रसिद्ध होणाऱ्या मासिकाच्या ते अनेक वर्षे सल्लागार मंडळावर होते. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ते पहिले मुख्य जनसंपर्क अधिकारी होते. 

पुणे

पुणे - ‘‘श्रेया आज २३ वर्षांची झाली आहे. ती जाणून आहे, की आम्ही तिला दत्तक घेतले आहे. तिच्याशी जोडलेला बंध हा रक्‍ताच्या...

06.06 AM

पुणे - गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा होत असून, त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी महापालिकेतर्फे रविवारी सकाळी दुचाकी रॅली...

05.48 AM

पुणे - एकीकडे आधार कार्डातील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत असताना, दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्या माहिती...

05.33 AM