येवलेवाडी आराखडाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार - काकडे

येवलेवाडी आराखडाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार - काकडे

पुणे - महापालिकेने तयार केलेला येवलेवाडीचा विकास आराखडा मंजूर करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती खासदार संजय काकडे यांनी दिली. एक आमदार किंवा ठराविक स्थानिक नेते म्हणजे पक्ष नाही, पुणेकरांनी बहुमत विश्‍वासाने दिले आहे. त्यामुळे पक्षाच्या हितासाठी आराखड्याच्या प्रश्‍नावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

येवलेवाडी गावाचा विकास आराखडा वादग्रस्त ठरला आहे. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी भाजपच्या आमदारांवर गैरप्रकार केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाचे इतर पदाधिकारी, आमदार, खासदार या विषयावर काहीच बोलत नसून, मी या आराखड्याच्या प्रश्‍नात लक्ष घालणार असल्याचे काकडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

प्रशासनाने तयार केलेला आराखडा, त्यामधील आरक्षणे, त्यानंतर शहर सुधारणा समिती, नियोजन समिती आणि मुख्य सभेने आराखड्यात केलेल्या बदलाची माहिती नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे मागितली आहे. ही माहिती येत्या चार- पाच दिवसांत माझ्या हाती येईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

टिळकांनी स्वराज्यासाठी गणेशोत्सव सुरू केला; पण पुणे फेस्टिव्हल हा सुराज्यासाठी सुरू राहावा, यासाठी राज्य सरकारकडून शिल्लक असलेला दोन वर्षांचा निधी एकत्र दिला जाईल. पुणे फेस्टिव्हलने पुण्याला जगाच्या नकाशावर नेले.
- गिरीश बापट, पालकमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com