‘एज्युस्पायर’ प्रदर्शनाला उस्त्फूर्त प्रतिसाद

‘एज्युस्पायर’ प्रदर्शनाला उस्त्फूर्त प्रतिसाद

इंजिनिअरिंगपासून माहिती-तंत्रज्ञानापर्यंत...कौशल्यात्मक साहित्यापासून ते रोबोटिक्‍सपर्यंत...शैक्षणिक विश्‍वातील अशा विविध गोष्टींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘एज्युस्पायर’ या शैक्षणिक प्रदर्शनाला मंगळवारी विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातील शिक्षणाच्या संधी...बदललेले अभ्यासक्रम...करिअरच्या संधी व तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी-पालकांना येथे घेता आली. ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)’तर्फे ‘एज्युस्पायर’ या प्रदर्शनाचे आयोजन केले असून, बुधवारपर्यंत (ता.३०) बालगंधर्व रंगमंदिर परिसरात हे प्रदर्शन पाहता येईल.

शिक्षण व करिअरविषयक माहिती देणारे हे प्रदर्शन आहे. ‘स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत, तर डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, सुहाना मसाला, मॅक ॲनिमेशन, हॅशटॅग यासोबतच ‘यिन’च्या काही प्रतिनिधींचे कौशल्यात्मक साहित्य येथे पाहता येणार आहे. या प्रदर्शनात विविध क्षेत्रांतील नामवंत शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळेल, तर पुणे स्मार्ट सिटीसंदर्भात माहिती देणारा एक विशेष स्टॉलही आहे. 

विद्यार्थ्यांनी बहुपर्यायी करिअरची निवड करावी. आज स्मार्ट सिटी आणि रोबोटिक्‍सचा जमाना असून, विद्यार्थ्यांनी स्वत-ला या तंत्रज्ञानाशी जोडले पाहिजे. स्वत-ला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करायला हवे. आवडीच्या क्षेत्रात करिअरची संधी मिळवून त्याच्यात यश मिळवावे. बहुआयामी बनलात तर नक्कीच करिअरमध्ये यशस्वी होऊ शकाल.
- डॉ. एस. आर. जोग, प्राध्यापक, 
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी

स्वत-मध्ये नेतृत्वगुण असणे गरजेचे आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. त्यातून व्यक्तिमत्त्व विकास होतोच. पण, आपल्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे शिक्षण घेताना फक्त मेहनत पुरेशी नाही तर आपल्या कॅम्पस मुलाखतींद्वारे नोकरी मिळेल यासाठी प्रयत्न करावा. निर्णयक्षमता, नेतृत्वगुण व स्पर्धेत टिकून राहण्याची जिद्द निर्माण करावी. 
- डॉ. दीपा जोशी, प्राध्यापक, 
डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी

ॲनिमेशनमध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. बदलत्या काळानुसार करिअर निवडताना भविष्यात ॲनिमेशन क्षेत्रातील संधीचाही विचार करावा. यातून नक्कीच उद्योग क्षेत्रात नवे बदल घडतील. करिअरचे क्षेत्र निवडण्यासाठी ॲनिमेशन चांगला पर्याय आहे. रोजगाराअभावी ज्यांना संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी हे क्षेत्र उपयुक्त ठरेल.
- संतोष रासकर, अध्यक्ष, सृजन कॉलेज ऑफ डिझाइन

व्हर्च्युअल रिॲलिटी हे नवे माध्यम सध्या रूढ होत आहे. त्यातही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्याचे महत्त्वही वाढले आहे. मोठ्या कंपनीकडून व्हर्च्युअल रिॲलिटीचा वापर केला जात आहे. म्हणूनच या क्षेत्रातही तरुणांना करिअर करता येईल. या क्षेत्रातील संधी शोधून तरुणाईने याकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहावे.
- अजय पारगे, संचालक, डिजिटल आर्ट व्हीआरई

करिअरकडे जबाबदारी म्हणून पाहावे. पैसा कमविण्याचे ध्येय ठेवण्यापेक्षा करिअरमध्ये आपण बहुआयामी कसे बनू याकडे लक्ष द्यावे. कामामध्ये आपला सहभाग हा महत्त्वपूर्ण असतो. आवडीच्या क्षेत्रात हाच सहभाग आणि आवड निर्माण करा. त्यातून यशाचे शिखर नक्कीच गाठता येईल.
- विजय नवले, प्राध्यापक, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ

विनामूल्य प्रवेश
‘एज्युस्पायर’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या एक्‍स्पिरियन्स झोनमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेता येईल. रोबो, नॅनो ड्रोन आदी तंत्राचा अनुभव त्यासोबत व्हर्च्युअल रिॲलिटीचाही अनुभव घेता येणार आहे. यासाठी इंडिया फर्स्ट रोबोटिक्‍स, डिजिटल आर्ट व्हीआरई यांचे सहकार्य मिळाले असून, रोबोटिक्‍सची प्रात्यक्षिके विनामूल्य पाहता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com