बहल नियुक्तीचा अंदाज खरा ठरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी क़ॉंग्रेसच्या गटेनेतेपदी सहाव्यांदा निवडून आलेले नगरसेवक योगेश बहल यांची बुधवारी (ता.8) नियुक्ती करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी (ता.6) सकाळने अनुभव आणि आक्रमकता जमेस धरता बहल यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. या नियुक्तीमुळे बहल हेच पालिकेतील विरोधी पक्षनेते होणार यावरही शिक्कमोर्तब झाले आहे.

बहल यांनी गटनेतेपद अगोदरही भुषविलेले आहे. तसेच माजी महापौर आणि पक्षाचे माजी शहराध्यक्षही होते. सध्या ते मुख्य प्रवक्तेपद भुषवित होते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी त्यांची ही नियुक्ती पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार केली आहे.

एकनाथ पवर यांचा अंदाजही तंतोतंत

पालिकेत सत्तेत येऊ घातलेल्या भाजपच्या गटनेतेपदी तथा सत्तारुढ पक्षनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड होईल, अशी शक्यताही सकाळने व्यक्त केली होती.ती सुद्धा तंतोतंत खरी ठरली.कारण या बातमीनंतर दुसऱ्याच दिवशी पवार यांचील भाजपने गटनेतेपदी निवड केली.

आता हॅटट्रिक

उद्योगनगरीचे महापौरपद यावेळी ओबीसीसाठी राखीव आहे.ते खऱ्या ओबीसीलाच देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तेथे नामदेव ढाके यांना पक्ष संधी देण्याची शक्यता सकाळने अगोदरच वर्तविलेली आहे.त्यातून एका दगडात दोन पक्षी भाजप टिपणार आहे.खऱ्या ओबीसीला न्याय देताना शहराचे पहिले नागरिक करण्याचा मानही खऱ्या भाजपाईला देण्याचा त्यांचा बेत आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी निगडीत असलेले ढाके हे भाजपचे जुने व एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.पवार व त्यांच्यानंतर ढाके यांच्या निवडीन पक्षातील जुन्या व एकनिष्ठांची नाराजी व संताप दूर करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.

Web Title: yogesh behl pcmc