17 वर्षीय युवतीवर पुण्यात बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

ही युवती पुण्यात आल्यानंतर आरोपीने कात्रज येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. गेल्या ऑगस्ट महिन्यात ही पीडित युवती गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिला गर्भपात करावयास भाग पाडले

पुणे - सोशल मिडियाच्या माध्यमामधून मैत्री केलेल्या एका 17 वर्षांच्या युवतीवर 21 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडित युवती ठाण्याची आहे; तर आरोपी पुण्याचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या या तरुणीस लग्नाचे वचन देऊन आरोपीने बळजबरीने तिला गर्भपातही करावयास लावला.

आरोपीचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून तो एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो.
गेल्या जानेवारी महिन्यात आरोपीने पीडित तरुणीस सोशल नेटवर्किंग साईटवरुन फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठविली. या मुलीने ही रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर सतत होत असलेल्या चर्चेमध्ये (चॅटिंग) आरोपीने तिला लग्नाचे वचन देत पुण्यास येण्यास सांगितले. ही युवती पुण्यात आल्यानंतर आरोपीने कात्रज येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. गेल्या ऑगस्ट महिन्यात ही पीडित युवती गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तिला गर्भपात करावयास भाग पाडले. यानंतर आरोपीने या युवतीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

भांबावलेल्या युवतीने आरोपीच्या पालकांस व नातेवाईकांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र त्यांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्‍वभूमीवर तिने आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: young woman raped in Pune