पुण्यात डीजेला नकार दिल्याने पोलिसाच्या डोक्यात रॉड

crime
crime

पुणे : डिजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही खडकीत डिजेसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरुन काही कार्यकर्त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी गज घालून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता खडकी येथे घडली. 

डि. एच. थिटे असे पोलिस कर्मचारीचे नाव असून ते खडकी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील एका मंडळाने डीजे लावन्याची थिटे यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. मात्र न्यायालयानेच डीजेवर बंदी घातल्याने ना हरकत प्रमाणपत्र देता येत नाही, असे थिटे यांनी कार्यकर्तेना सांगितले. मात्र त्यांना राग आल्याने त्यांनी थिटे यांच्या डोक्यात लोखंडी गजाने घाव घातले. त्यामध्ये थिटे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोन कार्यकर्ते यांना अटक केली आहे.

तर दुसऱ्या घटनेत गांधी चौकातील स्वागतासाठी स्टेजवर बसलेले कॅन्टोमेंटचे उपाध्यक्ष कमलेश चासकर, अभय सावंत, सुरेश कांबळे यांच्यावर बुक्का फेकल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे स्टेज कोसळल्याने तिघांसह काहीजणांना दुखापत झाली.जखमींना आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com