पिस्तूल बाळगल्याप्रकरणी परप्रांतीय युवकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय युवकास पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. 

पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय युवकास पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. 

सोनू धरवेंद्र राजपूत (वय 24, सध्या रा. लोहगाव, मूळ रा. शिवनी, जयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजपूत हा राजेंद्रनगर परिसरातील सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क परिसरात पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक बाबा दांगडे व चेतन शिरोळकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून त्यास पकडले. राजपूत याच्याकडे असलेले पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे या वेळी जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, दांगडे, शिरोळकर, संजय बनसोडे, सचिन जगदाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Web Title: Youth held with illegal gun in Pune