युवकांनी व्यसन न करण्याची शपथ घ्यावी - प्रविण माने

राजकुमार थोरात
शनिवार, 14 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : व्यसनामुळे अनेकांची आयुष्ये बरबाद झाली असुन युवकांनी व्यसन न करण्याचे शपथ घेण्याचे आवाहन पुणे जिल्ह परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले.

वालचंदनगर (पुणे) : व्यसनामुळे अनेकांची आयुष्ये बरबाद झाली असुन युवकांनी व्यसन न करण्याचे शपथ घेण्याचे आवाहन पुणे जिल्ह परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले.

लासुर्णे (ता.इंदापूर) येेथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणीच्या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी बोलत हाेते. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे , जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, माजी सदस्य प्रतापराव पाटील,  पंचायत समिती सदस्या सारिका लोंढे, सरपंच निर्मला अनिल चव्हाण, उज्वला उत्तम फडतरे,डॉ.योगेश पाटील, हर्षवर्धन लोंढें,संतोष लोंढे, दिपक लोंढे,विनायक लोंढे उपस्थित होते.यावेळी माने यांनी सांगितले की, कोणत्याही महापुरुषाला सुपारी खाण्याचे ही व्यसन नव्हते. याचा तरुण पिढीने महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श घेण्याची गरज आहे.व्यसनाधिनतामुळे कुंटूबे बरबाद होत असल्याने व्यसन न करण्याची शपथ घेण्याची गरज अाहे.  झेडपीच्या आरोग्य विभागाच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी योजना राबविण्यास सुरवात केली आहे.

तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी झेडपीच्या विविध योजना असून याचा लाभ घेण्याचे आवाहन माने यांनी केले.यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे,प्रवीण माने व  मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेेचे पूजन करण्यात आले .यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल गावडे, डॉ.ज्योतिराम देसाई, रामभाऊ पाटील, योगेश डोंबाळे, सागर मिसाळ,कालिदास राऊत, डॉ.संजीव लोंढे उपस्थित होते. या शिबिरामध्ये डोळे तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब तपासुन उपचार केले. महिलांच्या आरोग्याची तपासणी व मुलांची तपासणी, थॉयरॉड तपासणी  करण्यात आली.

Web Title: Youth should take an oath not to any addiction