सावली गायब होते तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

पुणे - भरदुपारी बारा वाजताची वेळ... सूर्य माथ्यावर आलेला... हळूहळू आपलीच सावली आपल्याच पायाखाली येऊ लागली अन्‌ काही क्षणांतच सावली गायब झाली, हा अनुभव अनेकांनी शनिवारी (ता. १३) घेतला. सूर्य ग्रह उत्तरायणातून दक्षिणायनाच्या दिशेने प्रवास करतो. त्या वेळी वर्षातून दोन वेळा सावली गायब होते. 

झिरो शॅडो डेनिमित्ताने ज्योतिर्विदा परिसंस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे या खगोलशास्त्रीय घटनेचे निरीक्षण करण्याचा आनंद आबालवृद्धांनी घेतला. दुर्बिणीतून दिसणाऱ्या सौर डागांचे निरीक्षणही उत्साहात करण्यात आले.

दरम्यान, दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी सावली गायब होऊ लागली. सावलीच्या हालचालीचे प्रत्येक जणाने उत्सुकतेने निरीक्षण केले.  

परिसंस्थेचे समीर गोडबोले म्हणाले, ‘‘उत्तरायण आणि दक्षिणायणामुळे सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही दिशांना २३.५ अंशामध्ये प्रवास करत असतो. सूर्य नेमका डोक्‍यावर आल्यावर सावली पायाखाली ९० अंशांवर येते. त्यामुळे ती दिसेनाशी होते. कर्कवृत्ताच्या उत्तरेला आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेला अशा घटना कधीच घडत नाहीत. प्रत्येक शहरात वेगवेगळ्या दिवशी ही घटना अनुभवता येणार आहे.’’

Web Title: zero shadow day