जिल्हा परिषद अध्यक्षांची गाडी आता अधिक आलिशान

मिलिंद संगई
बुधवार, 4 एप्रिल 2018

बारामती शहर - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांना या पुढील काळात आणखी आलिशान गाडीतून फिरणे शक्य होणार आहे. राज्य शासनाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आठ लाखांवरुन बारा लाखांवर नेण्यात आली आहे. 

शासनाने नुकताच एक अध्यादेश काढत पूर्वीच्या आठ लाखांच्या वाहन खरेदीवरची मर्यादा वाढवून रजिस्ट्रेशन चार्जेस, जीएसटी व इतर सर्व खर्चांचा समावेश करुन बारा लाखांपर्यंतच्या वाहन खरेदीची परवानगी दिली आहे. 2014मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना आठ लाखांची वाहन खरेदी मर्यादा निश्चित केली होती, चार वर्षांनंतर आता ही पन्नास टक्क्यांनी वाढवून बारा लाखांवर नेताना जिल्हा परिषद अध्यक्षांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे.

Web Title: Zilla Parishad president's car is now more luxurious