पवार कुटुंबीयांची चौथी पिढीही प्रचारात सक्रिय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

बारामती : आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी पवार कुटुंबियातील चौथ्या पिढीचे रोहित राजेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी आज अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी रॅलीत भाग घेतला.

आपल्या भावाच्या प्रचारासाठी जय पवार यांनीही दोन दिवसांपूर्वी रॅलीत सहभाग नोंदविला होता, आज पार्थ पवार यांनीही प्रचारात हजेरी लावत रोहित पवार यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले.

आज बारामती तालुक्यात शिर्सुफळ गुनवडी गटात रोहित पवार व पार्थ पवार यांनी बुलेटवरुन रॅली काढत मतदारांना अभिवादन केले. अनेक ठिकाणी घरोघरी जाऊनही त्यांनी मतदारांना राष्ट्रवादीची विकासकामे समजून सांगत विकासाला मत देण्याचे आवाहन केले. आज पार्थ पवार हेही रोहित पवार यांच्या सोबत प्रचारात सहभागी झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात कमालीचा उत्साह जाणवत होता.