दमबाजीचे राजकारण! (ढिंग टांग)

दमबाजीचे राजकारण! (ढिंग टांग)

"लेको, पुरावे टाका आधी, मग बोला! उचलली जीभ लावली टाळ्याला..!!,‘‘ संतप्त सुरातली आरोळी ऐकून आम्ही प्राणांतिक दचकलो. आमचे जुनेजाणिते नेते जे की नाथाभाऊ प्रचंड भडकलेले आम्ही पहिल्यांदाच पाहात होतो. 

"टाका ना पुरावे... बघत काय बसता! टाका, टाका!!,‘‘ नाथाभाऊ आमच्या अंगावर धावून आले. कुठल्या टेबलाखाली दडावे, या हेतूने आम्ही इकडेतिकडे पाहिले. वास्तविक आमच्याकडे नाथाभाऊंविरुद्ध ट्रकभर सोडा, एक चिंधीभरदेखील पुरावा नाही. आम्ही तसे काही बोललोदेखील नव्हतो. पण... 

"हे जे आपल्या पार्टीतले गद्दार आहेत ना, त्यांना हुडकून काढा आणि थुंका त्यांच्या तोंडावर! काय करा?‘‘ नाथाभाऊंनी हे वाक्‍य आमच्या इतक्‍या जवळ येऊन उच्चारले की आम्ही घाईघाईने खिशातून 

रुमालच काढला. 

"पच्च!‘‘ उत्तरादाखल आम्ही कोपऱ्यात थोडके रंगकाम केले. 

"मी गप्प आहे म्हणून, नायतर दाखवला असता इंगा एकेकाला! काय दाखवला असता?‘‘ नाथाभाऊंनी आता आमची कॉलर धरण्याचे तेवढे बाकी ठेवले होते.

"इं...इं...इंगा!,‘‘ घुसमटलेल्या आवाजात आम्ही म्हणालो. 

"अरे, हा पक्ष वाढविण्यासाठी मी काय काय के

लं नाही? दिवसरात्र खस्ता खाल्ल्या!! काय खाल्ल्या?‘‘ डोळे गरागरा फिरवत नाथाभाऊंनी आमचे बखोट धरून सवाल केला. खस्ता हा पदार्थ सर्वसाधारणपणे 

"वाट लावून टाकीन हां! ..आधीच सांगून ठेवतो. मग म्हणू नका, नाथाभाऊ उगाच सुका दम देतो म्हणून!..काय देतो?‘‘ अस्वस्थपणे मनगटे चोळत बर्फाळ आवाजात नाथाभाऊ अशा काही आवाजात हे वाक्‍य म्हणाले, की आम्ही जागच्या जागी शहारलो. खरेच, नाथाभाऊंचे तोंड बंद आहे, म्हणून तर (गेली दोनेक वर्षे) सारे काही सुरळीत चालू आहे. नाहीतर...असो. आम्ही काहीच बोललो नाही. चिक्‍कीसारखा असावा, अशी आमची (उगाचच) समजूत आहे. त्यामुळे आम्ही काहीही न बोलता फक्‍त चिक्‍की खाल्ल्याची ऍक्‍शन केली. पण त्यामुळे नाथाभाऊ आणखीनच भडकले. ते भडकले की जाम कोणाला ऐक्‍कत नाहीत, हे आम्हाला आता पक्‍के ठाऊक झाले आहे. 

"सांगा ना, काय देतो?‘‘ आमचा खांदा घुसळून त्यांनी पुन्हा विचारले. 

"सु...सुका दम!,‘‘ सुक्‍या नरड्यानिशी आम्ही! वास्तविक सुका दम म्हंजे काय, आणि ओला दम म्हंजे काय, ह्यातला फरक आम्हाला कळत नाही. पण ते जाऊ दे. खरे तर "नाथाभाऊ, कशाला चिडताय... होईल, सारं बैजवार! राजकारणात असे चालायचेच,‘ असे काहीबाही आम्हाला त्यांना सांगायचे होते. अंगावर येणारी गोष्ट प्रत्येक वेळी शिंगावर घ्यायची गरज नसते, असा आमचा आजवरचा जीवनानुभव आहे. 

"हं! मी तोंड उघडलं तर आख्खा देश हादरेल!...काय हादरेल?‘‘ नाथाभाऊंनी क्रुद्ध नजरेने आम्हाला भस्मसात करत विचारले. आमच्या पायाखालची तर जमीनच सर्रकन सरकली. मेजावरला चहाचा कोप थर्रर्र थर्ररला. मांडणीतील एकावर एक ठेवलेल्या फायलींचा गठ्‌ठा तिरपागडा झाला. आमच्या डोकीवरले शिप्तर आणि चष्मा खाली पडता पडता आम्ही झेलला. 

"देश...देश हादरेल!‘‘ घशाला कोरड फुटलेल्या अवस्थेत आम्ही उत्तर दिले. इलाजच नव्हता. "काय हादरेल?‘ ह्या सवालाला त्यांनीच उत्तर सुचवून ठेवले होते म्हणून बरे! अन्यथा आम्ही वेगळेच काही हादरेल, असे सांगून मोकळे झालो असतो. आमचीही धन्य आहे!! पुन्हा असो. 

"आपल्या पक्षातल्या गद्दारांनीच आमच्याविरुद्ध कुभांड रचावं?‘‘ नाथाभाऊंनी सात्त्विक संतापाने सवाल केला, "अशा वेळी आम्ही करावं तरी काय? मला तर वाटतं, आता देश हादरवण्याचा टाइम आला आहे!! हादरवू का? बोला!! 

"नको नको! हे काय भलतेच!‘‘ आम्ही घाईघाईने म्हणालो, "चाल्लंय ते तुका म्हणे त्यातल्या त्यात बरं चाल्लंय!‘‘ 

"हादरवतोच!‘‘ असे म्हणून नाथाभाऊ जागचे उठले. शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून आम्ही सारा धीर एकवटून म्हणालो- 

"जाऊ द्या हो! कर नाही, त्याला डर कशाची? तुम्ही जरा दमानिया घ्या बरं!‘‘ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com