फुलले पुन्हा फूल (ढिंग टांग)

British Nandi
मंगळवार, 12 जुलै 2016

लेखक! 

लिहिण्यासाठी श्रमत असतो 

शब्दाच्या शोधात दमत असतो 

आणि एका-एका अक्षरासाठी 

रोज रोज मरत असतो! 

 

कोणाला खूश करावे, 

करावे नाराज कोणाला 

कोणाचा करावा अवमान 

नि कोणा एकाचा सन्मान 

यासाठी नसतो कधीच 

आपली लेखणी झिजवत 

कोणताही सच्चा लेखक 

 

तो नेहमी देत असतो 

वाचणाऱ्याला नवे आत्मभान 

जगण्याच्या वाटेवर लागणाऱ्या 

विचार-तत्त्वज्ञानाचे दिशाज्ञान 

इतरांच्या वेदनांनी होतो दुःखी 

खरा लेखक कधीच नसतो सुखी 

एकच इच्छा असते मनात 

लेखक! 

लिहिण्यासाठी श्रमत असतो 

शब्दाच्या शोधात दमत असतो 

आणि एका-एका अक्षरासाठी 

रोज रोज मरत असतो! 

 

कोणाला खूश करावे, 

करावे नाराज कोणाला 

कोणाचा करावा अवमान 

नि कोणा एकाचा सन्मान 

यासाठी नसतो कधीच 

आपली लेखणी झिजवत 

कोणताही सच्चा लेखक 

 

तो नेहमी देत असतो 

वाचणाऱ्याला नवे आत्मभान 

जगण्याच्या वाटेवर लागणाऱ्या 

विचार-तत्त्वज्ञानाचे दिशाज्ञान 

इतरांच्या वेदनांनी होतो दुःखी 

खरा लेखक कधीच नसतो सुखी 

एकच इच्छा असते मनात 

अक्षर आपले, ठरावे ‘अ-क्षर‘! 

 

अंधारून येई अचानक, घोंगावे वादळ 

‘का लिहिलेस?‘ विचारत जाब 

तोंडाला फासले जाते काळे, 

जिवंतपणीच निघतात अंत्ययात्रा 

कापराच्या वडीसारखे भुर्रकन 

जळून जाते कागदी पुस्तक 

अमरच असतात त्यातले शब्द 

विचारांना जाळणाऱ्या इंधनाचा 

अजून लागायचा आहे शोध! 

 

दुखावलेला मग एक कोणी 

जाहीर करून टाकतो त्या क्षणी 

‘माझ्यातला लेखक मेला! 

शिक्षक पोटार्थी तेवढा उरला!!‘ 

 

उन्मादी जमाव साजरा करतो विजय 

शब्द-विचाराचा नि लेखकाचा पराजय 

लेखकाचे जिवंत कलेवर 

पडून असते हार-तुऱ्यांविना 

वाट पाहत राहते अविरत 

संजीवनी देणाऱ्या ऋषीची... 

 

 

ऐकत आलो आहोत वर्षानुवर्षे, 

न्यायदेवता आंधळी असते, 

डोळ्यांना काळी पट्टी बांधते 

करून हळूच डोळे किलकिले 

त्या पट्टीतूनही ती पाहते 

पाखडून निके सत्त्व-सत्य निवडते 

 

आवडत नसेल ते वाचू नये 

बघवत नसेल तर पाहू नये 

योग्य-अयोग्यचा निर्णय 

झुंडीने कधी घेऊ नये! 

 

हिंदी सिनेमात नेहमी दिसणारा 

लाकडी हातोडा दोनदा आपटून 

‘ऑर्डर‘-‘ऑर्डर‘चा पुकारा करून 

न्यायदेवतेने लिहिला निकाल, 

टाकले पेनाचे निब टचकन मोडून! 

 

न्यायासनावरून उठताना महोदय म्हणाले - 

‘उठ, पेरुमल मुरुगन, उठ! 

तुझ्यातील मेलेल्या लेखकाला 

नवसंजीवनी आहे शब्दांनीच दिली 

लिहिता राहा, लेखक म्हणून जगत राहा!‘ 

 

न्यायासनामागच्या भिंतीवर 

दिसणाऱ्या तिन्ही सिंहांनी तेव्हा 

मौनातच केलेली गर्जना ऐकली, 

‘सत्यमेव जयते, सत्यमेव जयते!‘ 

 

‘फूल फिर से खिल उठा है 

एक बड़े तूफ़ान के बाद...‘ 

...लेखक पुन्हा लिहू लागला! 

Web Title: #Dhing Tang British Nandi