इक लाश की सालगिरह... (ढिंग टांग)

इक लाश की सालगिरह... (ढिंग टांग)

कुठल्याश्‍या मुहल्ल्यात
कुठल्याश्‍या बैठ्या चाळीत
शहनाझबीचां घोंसला होता...

हसीमजाक करणारा,
दाराआड धरणारा,
चावट चावट बोलणारा,
एक भला शोहर होता.

अंगात नुसता शर्ट घालून
आंगनभर हुंदडणारा
नन्हामुन्ना बच्चा होता...

फज्जरला उठून
थरथरत्या हातानं
चुलीवरती चाय बनवून
मग मायेनं उठवणारी
एक बूढी सास होती...

"खाना खाये क्‍या बेटा'
असं हरघडी विचारणारा
वाटाभर बोंबील आणून
खजाना आणल्यागत
थैली सुपूर्त करणारा
थकामांदा शोहरचा अब्बू होता...

शहनाझबीचा संसार मानो,
सोने जैसा गहना होता.
गळ्यामधला काला धागा
सौ साल पहना होता...

एक दिन काय झालं की
सगळं उल्टं पाल्टं झालं
एक स्वप्न दिलवालं
डोळ्यांदेखत ओझल झालं...

सुबह कू गेलेला शोहर
घरी परत आलाच नाही
शहनाझबीचा सोने का गहना
नंतर कधी चमकलाच नाही.

लोग बोले व्हीटी ठेशन पे
गोलियों की बौछार हुई
जित्थे तित्थे लाशें गिरी
जिंदगी उसमें गुम हुई

खाली बर्तनसी जिंदगी में
शहनाझबी काही भरत नाही
खाली दिन जीता नही, और
खाली रात मरत नाही

शहनाझबीची जिंदगीही
तिथंच कुठंतरी संपून गेली
जीने की तो बात छोडो
मरने की उम्मीद करपून गेली...

शहनाझबी आता गुमसुम आहे...
काही हालचाल करत नाही.
खिडकीत नुसती बसून राहते
सांस तेवढा चालू आहे...

खिडकीत गुमसुम बसलेल्या
शहनाझला पाहून हल्ली
दस सालचा आदिलदेखील
बघून अनदेखी करतो

बूढी अम्मी थरथरत्या हातानं
तिला थोडाफार निवाला भरवते,
त्यातलं निम्मंअधिक शहनाझ
शून्यवत सांडून देते...

अब्बू एक दिवस म्हणाले अम्मीला
""इसका कुच करना पडेंगा,
कुछ तो इलाज करना पडेंगा,
आठ साल गुजरे, अस्लम की मां,
कुछ तो रास्ता निकल आए''

अम्मी हताश होउन म्हणते,
""अस्लम के अब्बू, क्‍या बोलते
रास्ते जिंदों के होते है, लाशों के नहीं...
सालगिरा जिंदों की गिनते, लाशों की नही...''

न जाने किसकी है इस रूह को तलाश,
जो अब भी सांसे ले रही ये जिंदा लाश.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com