मुले देवाघरची फुले ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रीय विनोदकाका ह्यांस शी. सा. न.
घर सजाने के लिये हम नर्सरीसे फूल लाते है
और घर के फूल नर्सरी में भेजते है...
अशी पोएम तुम्ही केली ना? वाचून मी खुप रडलो. विनोदकाका, तूम्ही मला खुप आवडता. लहान मूलांना शाळेत पाठवणारे लोक वाईट असतात. मि शाळेत जात नाही म्हणून मला बाबांनी छत्रीने मारले. मला राग आला. तूमची पोयम म्हणून दाखवल्यावर ते पण खुप रडले. म्हणाले, ‘असल्या कविता करतात का कुणी?’ जाऊ दे. माझ्या बाबांनी नवी छत्री आणली आहे.
लहान मुलांना शाळेत घालू नए असा डीसीजन तूमी दिला ना? आम्हाला खूप खूप आनंद झाला. हॅप्पी बर्थडेला पण नाही झाला एवडा आनंद. तूमचे खुप खुप आभार. थॅंक्‍यू.
तूमचा बंटी ऊर्फ फुसक्‍या ऊर्फ चिन्मय.
ता. क. तूम्ही पण शाळेत जाता का?
* * *
चि. चिन्मय, तुझे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. इतक्‍या लहान वयात लिहितोस? कौतुक वाटले ! शाब्बास, असाच लिहीत रहा. तुझ्यासारखी हुशार मुले आणखी हुशार व्हावीत, म्हणून तर मा. मोदीजी आणि आम्ही रोज काम करतो. पण चिनूबाळा, लहान मुलांना शाळेत घालू नये, असे मी म्हटलेले नाही हं ! शाळेत तर रोज जायलाच हवे की ! पण वयाच्या पाचव्या वर्षीच मुलांना शाळेच्या कोंडवाड्यात घालू नये, असे मी म्हटले आहे. तुला शाळा आवडते ना? मग ठीक. खूप शीक. मोठा हो आणि कमळाचे बटण दाब ! तुझा उत्कर्ष होईल. तुझाच विनोदकाका.
ता. क. : होय, मी शाळेत जात होतो व त्याचा पुरावासुद्धा विरोधकांना दिला आहे. मी आजही शाळेत जातो.
* * *
प्रीय विनोदकाका, तूमचे पत्र मीळाले. आक्षर माझ्यापेकशाही वाईट्‌ट आहे, हे बघून आनंद झाला. आता आई मला ओरडणार नाही. ओरडली तर तूमचे पत्र दाखवणार. मला आई आणि बाबांनी वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत घातले. अजून मी त्याच शाळेत तिसरीमध्ये शीकतो. उत्कर्ष म्हणजे काय? विकास का? अर्थ कळला नाही. तूमचा लाडका चिनू.
ता. क. : तूम्ही खरंच शाळेत जाता का? की बाबांसारखे घरीच बसता? बाबा कवी आहेत.
* * *
चि. चिन्मय, तुझे आई-बाबा चांगले आहेत म्हणून त्यांनी तुला सहाव्या वर्षी शाळेत घातले. आता तू तिसरीत आहेस. तर तुझे वय किती? सांग बरे उत्तर ! तुझे बाबा कवी आहेत हे वाचून आनंद वाटला. घरात कवी असले की बरे असते. मला पण छान छान कविता येतात. घर सजाने के लिए नर्सरीसे फूल लाते है, और घर के फूल नर्सरीमे भेजते है... ही कवितेची ओळ तुला आवडली ना? शाब्बास. मलाही आवडली.
आता तुझ्या प्रश्‍नाचे तपशीलात उत्तर देतो. होय, मी शाळेत नेमाने जातो. आमच्या शाळेला मंत्रालय असे म्हणतात. तिथे रोज शाळा भरते. आमचे मुख्याध्यापक राऊंडला कधी कधी येतात. कधी आम्ही त्यांच्याकडे राऊंडला जातो. आमच्या शाळेचे संचालक दिल्लीला बसतात. पण ते फॉरेनला असतात. त्यांनाही कविता आवडतात. तुझे वय कळव. तुला आणखी कविता पाठवीन. तुझा विनोदकाका.
* * *
प्रीय विनोदकाका, माझे नाव चिनू असून मी बत्तीस वर्षांचा आहे. तुमचे वय किती? चिनू.
* * *
चिन्या ***...मस्करी ***!!...नाहीतर **...***!!! तुझ्या *** तिथल्या तिथं *** ** मजबूत ***...!!! चूप!!!
पुन्हा पत्र पाठवशील तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com