शब्द मखर (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

हे गजवदना उन्मिलनयना गणनायक तू बुद्धिमते 
सिंदुरचर्चित भक्‍तिसमर्पित रिद्धिसिद्धिच्या प्राणपते 

शुंडप्रहारक उदरविदारक शूर्पकर्ण तू उग्र कधी 
तू प्रतिपाळक भवभयहारक वरदविनायक दयानिधी 

खलसंहारक विघ्नविनाशक निष्ठुर अविचल युद्धजिता 
ृदु कुसुमादपि मातामनरुपि भक्‍तिप्रसन्ना सुपूजिता 

प्रियकर दर्श शुभंकर तूच रसेश्‍वर पुण्यमुखा 
पार्थिवदेहा अगा विदेहा कार्यकरण तू सर्वसुखा 

किरीट लखलख कुंडल लोलक सुवर्णालंकृत मूर्त तुझी 
तेजोमय तू ज्योतिर्मय तू ओंकाराची रेघ तुझी 

ज्ञानमयी विज्ञानमयी तू सहस्ररश्‍मी तेजस तू 
चराचरातील चैतन्याचे श्रद्धेयाचे श्रेयस तू 

दंड चतुर्भुज पाशांकुशध्वज आशीर्वचना हात उभा 
कटि पीतांबर गौरांगावर दर्शनमात्रें स्तब्ध सभा 

ृदंग गदगद वीणा सद्‌गद थयथय हृदपद नृत्यनटो 
कुंकुंमरेखित नवथर रंगीत सकल कलांच्या बुद्धिपटो 

तू आरंभी तू प्रारंभी लयीत तू अन्‌ विलयीही 
दाता धाता तू निर्माता या हृदयी, त्या हृदयीही 

अंग सुकोमल लोचन उत्पल पायी नूपुर रुमझुमती 
ताल मृदंगे नर्तन रंगे ललित मनोहर दृश्‍य अती 

कंद कलांचा गंध फुलांचा तुझिया ठायी तत्त्व वसे 
दुर्वांकुरी तू सर्वांतरी तू तुजठायी अस्तित्त्व असे 

विभूतभूता शांकरपूता तू अभिरक्षित ब्रह्मविधा 
तडिता-लक्षणी अभिजनरक्षणी उद्‌गत सद्‌गत तू अभिधा 

तू अणुगर्भी अन तृणदर्भी तूच अंश आकार खरा 
सृजनाच्या क्षणि भक्‍ताचे मनी शब्दपुष्प स्वीकार करा

संपादकिय

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ('ट्राय') 'इंटरकनेक्‍शन युसेज चार्जेस' चौदावरून सहा पैसे प्रतिमिनीट एवढे कमी केल्यामुळे मोबाईल सेवा...

06.33 AM

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला नष्ट करण्याची भाषा वापरली. दुसरीकडे उत्तर कोरियाची खुमखुमीही दिवसेंदिवस...

05.18 AM

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 भाद्रपद सर्वपित्री अमावास्या.  आजचा वार : मधलावार.  आजचा सुविचार :...

04.03 AM