एका वेगवान अध्यायाची अखेर (श्रद्धांजली)

मुकुंद पोतदार  
सोमवार, 20 मार्च 2017

गेल्याच आठवड्यात ब्रिटनचे दिग्गज रेस ड्रायव्हर जॉन सुर्टीस यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. दुचाकी आणि चारचाकी अशा रेसिंगमधील दोन्ही प्रकारांत जागतिक ग्रांप्री विजेतेपद मिळविलेले ते एकमेव स्पर्धक होते. त्यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून भारतीय रेसिंगप्रेमी सावरत असतानाच माजी राष्ट्रीय रेसिंग विजेता अश्विन सुंदरचा काळाने बळी घेतला. भारतातील प्रतिभासंपन्न रेस ड्रायव्हरमध्ये स्थान मिळविलेल्या अश्विनचा रस्त्यावरील मोटार अपघातात मृत्यू व्हावा, हे धक्कादायक आहे. याचे कारण कार्टिंग, बाईक, फॉर्म्युला कार रेसिंग अशा विविध प्रकारांमध्ये त्याने विजेता म्हणून नावलौकिक कमावला होता.

गेल्याच आठवड्यात ब्रिटनचे दिग्गज रेस ड्रायव्हर जॉन सुर्टीस यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. दुचाकी आणि चारचाकी अशा रेसिंगमधील दोन्ही प्रकारांत जागतिक ग्रांप्री विजेतेपद मिळविलेले ते एकमेव स्पर्धक होते. त्यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून भारतीय रेसिंगप्रेमी सावरत असतानाच माजी राष्ट्रीय रेसिंग विजेता अश्विन सुंदरचा काळाने बळी घेतला. भारतातील प्रतिभासंपन्न रेस ड्रायव्हरमध्ये स्थान मिळविलेल्या अश्विनचा रस्त्यावरील मोटार अपघातात मृत्यू व्हावा, हे धक्कादायक आहे. याचे कारण कार्टिंग, बाईक, फॉर्म्युला कार रेसिंग अशा विविध प्रकारांमध्ये त्याने विजेता म्हणून नावलौकिक कमावला होता. भारताचा पहिला "फॉर्म्युला वन' ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन याचे मार्गदर्शन त्याला लाभले होते. लहान वयातच त्याने कार्टिंगपासून सुरू केलेली यशोमालिका "फॉर्म्युला 4'पर्यंत कायम राखली होती. 
अश्विनच्या यशोमालिकेची नुसती आकडेवारी पाहिली तरी आश्‍चर्य वाटते. एका दशकाच्या कारकिर्दीत विविध पातळ्यांवर लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर त्याला मायदेशात कमावण्यासारखे काहीच उरले नाही, अशी स्थिती निर्माण झाली. 
भारतात रेसिंगच्या प्रसारासाठी प्रामुख्याने टीव्हीएस, टाटा मोटर्स, एमआरएफ, जेके टायर, फोक्‍सवॅगन, सुझुकी आदी कंपन्यांनी विविध मालिका सुरू केल्या. या कंपन्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच कार्तिकेयन व करुण चंढोक हे दोन भारतीय "फॉर्म्युला वन' या सर्वोच्च व्यासपीठापर्यंत गेले, तर यंदाच डकार रॅली या सर्वाधिक खडतर प्रकारात सी. एस. संतोष व के. पी. अरविंद या भारतीयांनी तिरंगा फडकाविला. भारतात मर्यादित संधी उपलब्ध असताना अश्विन सुंदर याच्यासारख्या अनेक रेस ड्रायव्हरनी ट्रॅक दणाणून सोडला. अशा ड्रायव्हरना मायदेशात पाया भक्कम करण्याची आणि परदेशात त्यावर कळस चढविण्याची संधी सातत्याने मिळायला हवी. अश्विनचा मृत्यू ट्रॅकवर क्रॅशमध्ये झाला नसला तरी, त्याचा डाव अर्ध्यावर मोडला ही वस्तुस्थिती आहे. गो- कार्टच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकलेल्या अश्‍विनने 2012 व 2013 अशी सलग दोन वर्षे "फॉर्म्युला -4' चे राष्ट्रीय विजेतेपद पटकवले होते. भारतीय रेसिंगची जी काही पातळी आहे, त्यात अश्विन सुंदर हा एक महत्त्वाचा अध्याय ठरेल, यात शंका नाही. 

Web Title: mukund potdar writes about Ashwin sunder