संवेदनशीलतेचे कलेवर (मर्म) 

Pune Edition Article on The art of sensitivity Marm
Pune Edition Article on The art of sensitivity Marm

एखाद्या पार्सलची अदलाबदल होऊ शकते. सरकारी कामात फाइलचा घोळ होऊ शकतो; पण सांगलीत चक्‍क जिवंत रुग्ण आणि मृतदेह यांचीच अदलाबदल झाली! हा ढिसाळपणा सांगलीच्या "पद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयात' घडला. ज्यांच्या घरातील माणूस जिवंत आहे आणि रुग्णालयात उपचार घेत आहे, त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून "तुमचा माणूस मरण पावला आहे, त्याचा मृतदेह घेऊन जा', असे कळविले जाते. नातेवाईकही शवागारातील मृतदेह न्यायला येतात. त्यांना पहिला धक्‍का बसतो की,"" हा आपला माणूस नाहीच.'' तरीही त्यांना न्यायला भाग पाडले जाते. प्रत्यक्षात रुग्ण उपचार घेत खाटेवर पडून असल्याचे स्पष्ट झाले. 

बेवारस मृतदेहाला जिवंत माणसाचे नाव लावण्यापुरताच हा ढिसाळपणा आहे, असा पवित्रा कोणी घेत असेल तर ती निर्ढावलेपणाची हद्द मानायला हवी. एखाद्या रुग्णाचा 24 तासांच्या आत मृत्यू होतो, तेव्हा कुटुंबीयांना याबाबत सांगून मग पंचनाम्याच्या उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविला जातो. तीन तज्ज्ञांच्या हाताखालून मृतदेह जात असतो. म्हणजे सर्वच टप्प्यांवर निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट होते. एकूण सरकारी रुग्णालयांच्या यंत्रवत कारभाराच्या हिमनगाचे हे एक टोक. तासगाव येथील बागवडे कुटुंबीयांनी घेतलेला हा भीषण अनुभव प्रशासकीय यंत्रणांमधली संवेदनशीलता किती रसातळाला गेली आहे, हेच दाखवतो. या कुटुंबातील अविनाश बागवडे (वय 55) हे आजही बेशुद्धावस्थेत उपचार घेत आहेत. मात्र, ते नव्हे तर सारी यंत्रणाच आज कोमात गेली आहे, असेच म्हणावे लागेल. 

या पोस्टमार्टम प्रकरणाच्याच पोस्टमार्टमचे आदेश आता देण्याची वेळ आली आहे. त्याचे यथावकाश सारे तपशील बाहेरही येतील. मात्र, त्यातून सरकारी रुग्णालयांच्या कारभारात संवेदनशीलता येईल का, ते उपचार सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य करतील का, हे प्रश्‍न अधिक महत्त्वाचे आहेत. आरोग्यसेवा महागली असल्याने आज सरकारी रुग्णालयेच गरिबांचा आधार आहेत. तेथल्या पायाभूत सुविधांचे प्रश्‍न आहेतच; पण खरी तूट आहे ती संवेदनशीलतेची आणि इच्छाशक्तीची. यानिमित्ताने रुग्णांवर झालेले उपचार तरी योग्य होते का, याचीही चौकशी व्हावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com