हौस ऑफ बांबू : ये कहां आ गये हम?

नअस्कार! खरं तर मला अजिबात वेळ नाही; पण केवळ तुमच्यासाठी म्हणून लेखणी हाती घेतली. आमच्या पुण्यात `पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चं विसावं पर्व डॉ. जब्बार्जी पटेल यांनी ठरवल्याप्रमाणे धडाक्यात सुरु झालंय.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal
Summary

नअस्कार! खरं तर मला अजिबात वेळ नाही; पण केवळ तुमच्यासाठी म्हणून लेखणी हाती घेतली. आमच्या पुण्यात `पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चं विसावं पर्व डॉ. जब्बार्जी पटेल यांनी ठरवल्याप्रमाणे धडाक्यात सुरु झालंय.

नअस्कार! खरं तर मला अजिबात वेळ नाही; पण केवळ तुमच्यासाठी म्हणून लेखणी हाती घेतली. आमच्या पुण्यात `पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’चं विसावं पर्व डॉ. जब्बार्जी पटेल यांनी ठरवल्याप्रमाणे धडाक्यात सुरु झालंय. मी अगोदरच ऑनलाइन नोंदणी केली होती, फेस्टिवलचा पासही आत्ता माझ्या गळ्यात आहे. जवळ जवळ शंभर-सव्वाशे सिनेमे बघण्याची जबाबदारी माझ्या अंगावर पडली आहे. आता आठवडाभरात एवढे सिनेमे बघायचे म्हटल्यावर वेळ तरी काढणार कसा, अं?

डॉक्टर जब्बार्जींनी गळ घातली म्हणून मी येत्ये म्हणाल्ये खरी, पण बरीच कामं बाकी होती. उदगीरचं साहित्य संमेलनही आता उंबरठ्यावर आलंय. त्यात त्या कोरोनानं (एकदाचं ) तोंड काळं केल्यानं वारं भरलेल्या अवखळ वासरागत माझी सांस्कृतिक अवस्था झाली. परवा जंगली महाराज रोडवर ‘मथुरा’ मधून पार्सल घ्यायला गेले होते, तेव्हा नेमके आमचे जब्बार्जी भेटले. म्हणाले, ‘‘येताय ना?’’ अश्शी लाजल्ये!

‘पण जब्बार्जी, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या नावातच द्विरुक्ती आहे. पुण्यातला फेस्टिवल म्हटला की तो इंटरनॅशनलच असणार हे वेगळं सांगायला नकोच.’’ मी म्हटलं. जब्बार्जींनाही ते पटलं. पण मग दोन दिवस ब्युटी पार्लरमध्ये वेळ गेला. आता मात्र फेस्टिवल एके फेस्टिवल हं! कोरोनाचं तोंड काळं करणं आणि सगळी सिनेमागृहं पूर्ण क्षमतेनं चालू होण्याच्या मुहूर्तावर यंदाचा ‘पिफ’ पार पडतोय. एवढंच नाही तर तो पं. भीमसेन जोशी, सत्यजित राय आणि साहिर लुधियानवी या तिघांच्या जन्मशताब्दीच्या सूत्रात बांधला आहे. शिवाय तो लतादिदींना समर्पितदेखील आहे. किती ही निमित्तं!! ही कसरत फक्त जब्बार्जीच करु जाणोत!

शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी ‘बालगंधर्व’ला गेले. मास्क लावल्यामुळे कोणी कोणाला नीट ओळखत नव्हतं. हळू हळू मास्क उतरले, आणि लोक एकमेकांना ओळखू लागली. बॅक स्टेजला चक्कर टाकावी, म्हणून तिथं गेले. तर जब्बार्जी सूत्रसंचालनासाठी तयार झालेल्या श्रेया बुगडेला ‘‘ विनोदी कार्यक्रम नाही! इंटरनॅशनल आहे!! आणि स्वप्निल तू…श्रेयानं विनोद केला असं समजून खळखळून हसू नकोस. पुण्यात वाईट दिसतं…’’ असं बॅकस्टेजला बजावत होते. स्वप्निल बिचारा टेन्शन येऊन गोरामोरा दिसत होता.

‘चल, हवा येऊ द्या’ असं स्वप्निलकडे बघत श्रेया म्हणाली, आणि तडक स्टेजकडे निघाली. संपूर्ण कार्यक्रमात हा एकमेव विनोद घडला. बाकी दोघांनी सूत्रसंचालन मात्र छानच केलं. बॅक स्टेजला जब्बार्जींच्या सूचनांचा भडिमार चाललेला असतानाच जनाब जावेद अख्तर आले. आपल्याला ख्यातनाम शायर साहिर लुधियानवीसाहेबांबद्दल थोडं बोलायचं आहे, हे त्यांना नुकतंच कळलं होतं. ते अचंबित झाले होते. अचंबित झाल्यावर ऊर्दू लिहाजमध्ये ‘कमाल है,’ असं म्हणतात, हेही मला तेव्हा कळलं. जब्बार्जी त्यांना काय काय बोलायचं, कसं कसं बोलायचं, याचं मार्गदर्शन करत होते. ‘ये कहां आ गए हम, यूंही साथ साथ चलते’ असे भाव जनाब अख्तर यांच्या चेहऱ्यावर थोडावेळ उमटले. जब्बार्जींसारखा उत्तम व्यवस्थापक उभ्या भारतीय सांस्कृतिक अवकाशात नसेल!

जनाब अख्तर यांनी साहिरसाहब यांना याद करुन गाडी भारतीय चित्रपट संगीत, जुनी गाणी, लतादिदींचं योगदान अशी स्टेशनं घेत घेत भाषण संपवलं. त्यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी चढली होती. वाण नाही पण गुण लागलाच म्हणायचा. या फेस्टिवलच्या गंमती जमती पुढल्या वेळी सांगीन. खूप सिनेमे बघायचे गेल्या दोन वर्षात राहून गेलेत!! आत्तासुध्दा ‘नेबर्स’चा शो गाठायचा आहे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com