मैंने क्‍या खोया? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

हे जे नानासाहेब फडणवीस आहेत, त्यांना छगनबाप्पांचे अनेकानेक इष्ट शुभाशीर्वाद. त्यांनाच कशाला? सगळ्यांनाच खूप खूप शुभाशीर्वाद. मोठ्यांना नमस्कार आणि त्याहूनही मोठ्ठ्यांना (म्हंजे कोणाला, हे ओळखलेत ना?) लाख लाख दंडवत. तूर्त माझे (भायखळ्यात) मज्जेत चालले आहे. इतरांचे माहीत नाही; पण माझे मात्र अच्छे दिन आले आहेत! राजकारणाचे ताणतणाव नाही, सभा-भाषणे, आरोप-प्रत्यारोप काही काही नाही. प्रत्येक क्षण निवांतपणे भोगावयाचा! हे एक छानसे कुटुंबच आहे. सुजाण संसारी मनुष्य नोकरीधंद्यातले ताणतणाव घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवून हसतमुखाने कुटुंबीयांसमवेत जगतो. तसेच इथे आहे!

हे जे नानासाहेब फडणवीस आहेत, त्यांना छगनबाप्पांचे अनेकानेक इष्ट शुभाशीर्वाद. त्यांनाच कशाला? सगळ्यांनाच खूप खूप शुभाशीर्वाद. मोठ्यांना नमस्कार आणि त्याहूनही मोठ्ठ्यांना (म्हंजे कोणाला, हे ओळखलेत ना?) लाख लाख दंडवत. तूर्त माझे (भायखळ्यात) मज्जेत चालले आहे. इतरांचे माहीत नाही; पण माझे मात्र अच्छे दिन आले आहेत! राजकारणाचे ताणतणाव नाही, सभा-भाषणे, आरोप-प्रत्यारोप काही काही नाही. प्रत्येक क्षण निवांतपणे भोगावयाचा! हे एक छानसे कुटुंबच आहे. सुजाण संसारी मनुष्य नोकरीधंद्यातले ताणतणाव घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवून हसतमुखाने कुटुंबीयांसमवेत जगतो. तसेच इथे आहे! बाहेरील जगातल्या भानगडी गजांपलीकडेच राहतात. इतकी तणावरहित जागा पृथ्वीतलावर नसेल. तुम्हीही काही काळ येथे राहून बघा, असे म्हणणार होतो; पण ते प्रशस्त दिसत नाही, म्हणून म्हणत नाही!! असो. 

फारा दिवसांनी हे जे पत्र लिहावयास घेतले आहे, ते कृपया वाचावे आणि पत्रोत्तर धाडावे. कारण मागेही काही पत्रे तुम्हाला लिहिली होती. तुमचे पत्रोत्तर आले नाही, म्हणून काळजी वाटली, इतकेच. ‘ऍड्रेसी नॉट फौंड‘ परत आलेल्या पत्राचा मालक शेजारच्या बराकीतच भेटायचा, असे हे दिवस आहेत. पुन्हा असो. 

पत्र लिहिण्यास कारण, की सक्‍तवसुली संचलनालयाने नुकत्याच आमच्या 22 प्रापर्ट्यांवर टांच आणल्याचे कानावर आले. खरे आहे का? तसे असेल तर मला समाधान आहे. आर्थर रोडला राहायला आले, की सारेच विश्‍व घर वाटू लागते व सारेच आपले सखेसुहृद आणि आप्तेष्ट वाटू लागतात. मालमत्ता ही एक क्षणभंगुर गोष्ट आहे, हे मला कळून चुकले आहे. नि:संग होण्यासाठी हिमालयात जाण्याची काहीही आवश्‍यकता नाही. काही तरी कृत्य करून आर्थर रोडला ऍडमिशन मिळवण्याचे जमवले, तरी भागते. मला तर आताशा काहीही वाटत नाही. काल सायंकाळी कोर्टात हजेरी लावून परत (आणलेला) माझा नवा दोस्त उस्मान कंघी म्हणाला, की बॉस, तुम्हारा प्रॉपर्टी का इन लोग बॅंड बजारेला है! कुच करो!! मी फक्‍त हाताचा पंजा उडवत गूढ हसलो आणि म्हणालो, ‘‘तुमने क्‍या पाया, जो तुमने खोया? तुम क्‍या लाये थे, जो तुमने खो दिया?‘‘ आश्‍चर्य म्हणजे हे ‘गीतासार‘ आहे, हे सलीम कंघीला माहीत होते. 

‘‘बॉस, ये गीतासार है ना?‘‘ त्याने विचारले. मी उलट विचारले, ‘ मित्रा, तुला रे काय ठाऊक? अवघं आयुष्य तू पोलिसांचा ससेमिरा हुकवण्यात घालवलंस? गीतासार तुला माहीत असेल, तर सन्मार्गाला कसा नाही रे लागलास?‘‘ 

‘‘वो परेल के मारवाडी का गेम बजाने कू गया था, तब्बी उसके दिवाल पे लिखेला था!‘‘ किंचित लाजत उस्मानने खुलासा केला. 

सारांश, मी सगळ्याच्या पलीकडे गेलो आहे, तरीही आपले मीडियावाले ‘भुजबळांचा पाय खोलात‘ किंवा ‘भुजबळांच्या अडचणी वाढल्या‘ असल्या निरर्थक मथळ्याच्या बातम्या देतात. इमारत दिल्लीतली असो, पार्ले-सांताक्रूझ किंवा नवी मुंबईची असो अथवा आमच्या नाशकातली असो, मला काय त्याचे? जाऊ दे झाले. तेव्हा या बातम्या थांबवता आल्या तर कृपया थांबवाव्यात, येवढेच. बाकी सर्व सुक्षेम. आपलाच. छगनबाप्पा. 

ता. क. : मी मफलरचा त्याग केला असून, कानटोपी स्वीकारली आहे, हे तुम्ही टीव्हीवर पाहिलेत का? मस्त दिसते. असो!

Web Title: What I lost?