कुस्तीतील रागिणी

संभाजी गंडमाळे
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

सिंगापुरातील आशियाई हॉकी स्पर्धेतील भारत आणि चीन महिला संघातील अंतिम सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असतानाच शनिवारी कुस्तीत कोल्हापूरच्या रेश्‍मा अनिल मानेने सुवर्णपदकावर, तर बीडच्या सोनाली महादेव तोडकरने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. भारतीय महिला हॉकी संघानेही पारंपरिक प्रतिस्पर्धी चीनला धूळ चारत अभिमानाने तिरंगा फडकवला. एकीकडे राष्ट्रीय खेळात रणरागिणींनी मारलेल्या बाजीचा आनंदोत्सव देशभरात सुरू झाला आणि त्याचवेळी रांगड्या मातीतील महाराष्ट्रात रेश्‍मा आणि सोनालीच्या यशाने दुसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली.    

उत्तर प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या रेश्‍माने आपला धडाका सिंगापूरमध्येही कायम ठेवला. स्पर्धेतील ६३ किलो गटात अंतिम सामन्यात तिने भारताच्याच गार्गी यादवला ढाक डावावर चितपट करून अवघ्या अकरा सेकंदांत सुवर्णपदकावर नाव कोरले. रेश्‍मा कोल्हापुरातील राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली घडते आहे. राम सारंग यांनीही १९८२ मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

त्यानंतर ३४ वर्षांनंतर रेश्‍माने सुवर्णपदक खेचून आणले. ५८ किलो वजनी गटात सोनाली अंतिम फेरीत भारताच्याच मंजूकडून पराभूत झाली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही तिने रौप्यपदक मिळवले होते. रेश्‍मा करवीर तालुक्‍यातील वडणगे गावची, तर सोनाली बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यातील मंगरूळ गावची. या दोन्हीही रणरागिणी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या. तिसरी-चौथीपासूनच त्या तालमीत घाम गाळू लागल्या.

रेश्‍माच्या वडिलांनी तर घराशेजारी खास तिच्या सरावासाठी तालीम बांधली. राज्य-राष्ट्रीय पातळीपर्यंतचा खर्च कसाबसा त्यांच्या कुटुंबांना शक्‍य होता. मात्र, पुढे देशाबाहेरच्या स्पर्धा करायच्या म्हंटलं की, आर्थिक घडी बसेना. मग समाजातील विविध घटकांनीच त्यांना पाठबळ दिले आणि या दोन्ही रणरागिणींनी पदके खेचून आणत साऱ्यांचा विश्‍वास सार्थ ठरवला. ‘आमच्या पोरींनी देशाचं नाव उंचावलं’, असे ते ताठ मानेने सांगतानाच आता पुढे ऑलिंपिकचे ध्येय गाठायचे असल्याचा विश्‍वासही व्यक्त करतात.

Web Title: wrestling women