दुनियादारी : आम्ही असू नाटकी

‘‘इतका का इरिटेटेड आहेस?’’ राधिकानं चिडचिड करून पायरीवर बसलेल्या अभिनवला विचारलं.
True Love
True LoveSakal
Summary

‘‘इतका का इरिटेटेड आहेस?’’ राधिकानं चिडचिड करून पायरीवर बसलेल्या अभिनवला विचारलं.

‘‘इतका का इरिटेटेड आहेस?’’

राधिकानं चिडचिड करून पायरीवर बसलेल्या अभिनवला विचारलं.

‘‘सोड ना यार...’’ अभिनव पचकत म्हणाला.

‘‘सांग ना यार...’’ राधिका त्याचा शेजारी पायरीवर बसली आणि आणि त्याच्या खांद्याला खांदा मारून म्हणाली.

‘‘काय सांगू? कसं सांगू?’’

‘‘कसं पण सांग. बघू काय कळतं का?’’

अभिनवने राधिकाकडेृं बघितलं. ती तिच्या काजळ घातलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे एक टक उत्तराची वाट बघत पाहत होती. अभिनवने तिच्याकडे बघून एक हलकी हारलेली स्माईल दिली.

‘‘का करती आहेस हे? राहू दे ना मला जरा चिडचिड करत!’’ अभिनव चेहरा दुसरीकडे करून म्हणाला.

‘‘कसंय ना मित्रा... मी ''मित्रा'' म्हणतीये तुला बरका... तू काय माझा बॅचमेट किंवा नुसता ओळखीचा नाहीयेस की नाही कोणीतरी? मग मित्र म्हटलंच आहे, तर भोगतीये त्याच्या जबाबदाऱ्या सुद्धा! आता ड्रामा बंद कर आणि बोल!’’ राधिका अभिनववर तशीच तिची काजळ घातलेली नजर रोखून म्हणते.

अभिनवला थोडंसं गालातल्या गालात हसू येतं.

‘‘अगं, फार वाईट दिवस सुरू आहे. माझा आवडता पेन सकाळी हरवला. इकडे येता येता गाडीतलं पेट्रोल संपलं मध्येच, मी विसरून गेलो होतो सो गाडी ढकलत पंपावर न्यावी लागली... सगळीकडं उशीर झाला, सगळीकडं कटकट आणि...’’ अभिनव बोलता बोलता थांबला.

‘‘आणि...??’’ राधिकानं विचारलं.

अभिनवनं मोठा श्वास सोडला आणि म्हणाला, ‘‘...आणि मला परत नाटकात घेतलं नाही आर्ट सर्कलने. ग्रॅज्युएशन आणि कदाचित ह्या कॉलेजमधलं शेवटचं वर्ष आहे हे आणि मी एकदाही नाटकात नाही. कसली सॅड लाईफ आहे ही...’’

राधिकानं भुवया उंच केल्या पण आश्चर्याने नाही तर वैतागलेल्या भावनेने आणि म्हणाली, ‘‘तू जरा येडा आहेस का रे? ते काय आयुष्य आहे का?’’

‘‘माझ्यासाठी आहे!’’

‘‘असं तूच डिक्लेअर केलं आहेस, ते सुद्धा लोकांचं मत - इस्पेशली आर्टस् सर्कलमधल्या लोकांचं मत तू तुझ्या आयुष्यावर बिंबवलं आहेस! समजा नाटक नसेल तुझ्या आयुष्यात तर तू काय आयुष्यभर लोकांवर चिडचिड करत बसणारेस का?’’ राधिका त्याचं वाक्य कापत म्हणाली.

‘‘तुला नाही समजायचं...’’

‘‘कदाचित बरोबर आहे तुझं. नाही समजणार मला ते, पण इतकं तर समजतंय की तुझ्याकडे खूप टॅलेंट आहे आणि तो नाटकातच दिसला पाहिजे असं काही गरजेचं नाही. अरे इतक्या छान कविता लिहितोस ना तू... वेगळी वाट पकड, क्रिएटिव्ह लिखाणाकडं जा... जग ३ वर्षातल्या नाटकात न मिळालेल्या एखाद्या चान्सपेक्षा खूप मोठं आहे!’’

‘‘हे तू बोलतीयेस? जिला माझं लिहिलेलं फिल्मी, ड्रामेबाज आणि सो सो वाटतं? तू कधीपासून माझ्या लिखाणाची स्तुती करायला लागलीस?’’ अभिनवनं एक भुवई वर करून तिच्याकडं बघत तिला विचारलं.

राधिका सारकॅस्टिकली एका गालात हसली आणि तिनं तिची बॅग उघडली. त्यातून तिनं एक छान बारीक डबा काढला आणि अभिनवच्या हातात दिला.

‘‘हे घे!’’

तिचा दिलेला तो फॅन्सी डबा अभिनवनं उघडला. त्यात एक मस्तं पेन होता.

‘‘मी तुझ्या नाटकाचं तर काही करू शकत नाही आणि तुला गाडीत पेट्रोल भरलंस का हे पण विचारणार नाहीए वेळोवेळी, पण हां... हे माझ्याकडचं छान पेन तुला देऊ शकते. आता ह्यालाच तू ''आवडीचं पेन'' म्हणायचं... कळालं का?’’ राधिकानं ऑलमोस्ट बजावलंच.

अभिनवनं ते पेन कौतुकानं हातात घेतलं. त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यात हलकं पाणी साठलं, ते त्यानं दुसरीकडं बघून हळूच अडवलं.

मग त्याने राधिकाकडं पुन्हा बघितलं आणि तिच्या खांद्याला खांद्यानं धक्का मारून म्हणाला, ‘थँक्यू... मैत्रीण!’

राधिकानं पण त्याच्या खांद्याला खांद्यानं पुन्हा धक्का मारला आणि म्हणाली, ‘वेलकम मित्रा!’

दोघही गोड हसले.

‘‘बाय द वे...’ राधिका पुन्हा म्हणाली, ‘‘...तो मागच्या वर्षीप्रमाणं तुझा ह्या वर्षी सुद्धा नाटकात नाही घेतलं म्हणून २ आठवडे डिप्रेशनच्या नावाखाली कॉलेजला न यायचा प्लॅन ऑन होता ना तुझा?’’

अभिनव खुद्कन हसला. ‘‘तू जरा जास्तच ओळखायला लागली आहेस का मला?’’

‘‘अतीच!’’ राधिका म्हणाली आणि जोरजोरात हसायला लागली.

आपली माणसं आपल्या अवघड काळात सोबत असली, की नाटकीपणासुद्धा नाटकी नाही राहत, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com