अशी बोलते माझी कविता (अमित वाघ)

अमित वाघ, अकोला (८८८८८६३३००)
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

चिंता
श्रीमंत दुःख झाले अन्‌ मौल्यवान चिंता
गेली भणंग करुनी आयुष्यमान चिंता!

जर आटलेच अश्रू तर रक्त पाज ताजे...
म्हणते ‘अजून नाही शमली तहान’ चिंता!

हे आजकाल जीवन ज्या धावते गतीने
उघडून त्यामुळे ही बसली दुकान चिंता!

प्रत्येक माणसाच्या नशिबात खोट आहे...
अन्‌ केवढी निघाली ही भाग्यवान चिंता!

माणूस संकटांना घेतो कशा प्रकारे...
त्याच्यावरून ठरते मोठी-लहान चिंता!

चिंता
श्रीमंत दुःख झाले अन्‌ मौल्यवान चिंता
गेली भणंग करुनी आयुष्यमान चिंता!

जर आटलेच अश्रू तर रक्त पाज ताजे...
म्हणते ‘अजून नाही शमली तहान’ चिंता!

हे आजकाल जीवन ज्या धावते गतीने
उघडून त्यामुळे ही बसली दुकान चिंता!

प्रत्येक माणसाच्या नशिबात खोट आहे...
अन्‌ केवढी निघाली ही भाग्यवान चिंता!

माणूस संकटांना घेतो कशा प्रकारे...
त्याच्यावरून ठरते मोठी-लहान चिंता!

टॅग्स