अशी बोलते माझी कविता (अमोल कोरडे)

अमोल कोरडे, ९८९०८०७७७२
रविवार, 7 मे 2017

तुझं गाव

तुझ्या अनोळखी गावी आलो
तरी सगळंच परिचयाचं वाटत आहे

ही माती तुझ्या पाऊलखुणा दाखवत आहे
ही हवा तुझा स्पर्श घेऊन आल्याचं जाणवत आहे

का कुणास ठाऊक,
वाटत आहे मला...
की या गुरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा नाद
कधी तुझ्याही कानी पडला असेल...
ही राघूनं मैनेला घातलेली आर्त साद
कधी तुलाही बेचैन करून गेली असेल...
या उंच उडणाऱ्या पक्ष्यावर
आज तुझीही नजर रोखलेली असेल...

अनोळखी तुझं गाव
तरी सगळंच परिचयाचं वाटतं आहे!
या हवेत तुझा गंध आहे
मग कसं म्हणू
तुझं गाव मला अनोळखी आहे!

तुझं गाव

तुझ्या अनोळखी गावी आलो
तरी सगळंच परिचयाचं वाटत आहे

ही माती तुझ्या पाऊलखुणा दाखवत आहे
ही हवा तुझा स्पर्श घेऊन आल्याचं जाणवत आहे

का कुणास ठाऊक,
वाटत आहे मला...
की या गुरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा नाद
कधी तुझ्याही कानी पडला असेल...
ही राघूनं मैनेला घातलेली आर्त साद
कधी तुलाही बेचैन करून गेली असेल...
या उंच उडणाऱ्या पक्ष्यावर
आज तुझीही नजर रोखलेली असेल...

अनोळखी तुझं गाव
तरी सगळंच परिचयाचं वाटतं आहे!
या हवेत तुझा गंध आहे
मग कसं म्हणू
तुझं गाव मला अनोळखी आहे!

Web Title: amol korde's poem in saptarang