अशी बोलते माझी कविता (अशोक कोतवाल)

अशोक कोतवाल, ९८५०११७५३९, जळगाव
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

मी बोलतो...

मी बोलतो
जेव्हा मला बोलावंसं वाटतं
ज्यानं हलतो हवेचा पडदा जरा तरी
अथवा उठतात लोट ध्वनींचे
आदळतात कुठंतरी

मी बोलतो तेव्हा थांबतात
कुणी जाणारे
बघतात काहीजण माना वळवून
हसतात कुणी
काढतातही काहीजण मला वेड्यात

मी बोलावं
अन्‌ असंच बोलत राहावं काहीतरी
वाटत असतं अनेकांना
‘आपलंच तर बोलतो हा’ असं वाटून
सुखावतातही काहीजण

मी बोलावं की बोलू नये?
असा एक तर्कही आहे अनेकांमध्ये
वाटतो मी कुणाला
एक मिशन
तर कुणाला त्यांचाच एक मतवादी

मी बोलतो...

मी बोलतो
जेव्हा मला बोलावंसं वाटतं
ज्यानं हलतो हवेचा पडदा जरा तरी
अथवा उठतात लोट ध्वनींचे
आदळतात कुठंतरी

मी बोलतो तेव्हा थांबतात
कुणी जाणारे
बघतात काहीजण माना वळवून
हसतात कुणी
काढतातही काहीजण मला वेड्यात

मी बोलावं
अन्‌ असंच बोलत राहावं काहीतरी
वाटत असतं अनेकांना
‘आपलंच तर बोलतो हा’ असं वाटून
सुखावतातही काहीजण

मी बोलावं की बोलू नये?
असा एक तर्कही आहे अनेकांमध्ये
वाटतो मी कुणाला
एक मिशन
तर कुणाला त्यांचाच एक मतवादी

पण ते काहीही असो
मी बोलतो आणि बोलतच राहीन
चित्ताची धूळधाण करणाऱ्या
माझ्या या समकाळाविषयी...

Web Title: ashok kotwal's poem

टॅग्स
फोटो गॅलरी