किशोरीताईंबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

किशोरीताईंबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?

संगीतातील जुन्या जाणत्यांसह नवख्या रसिकांनाही कायम किशोरी अमोणकर यांच्याबद्दल कुतूहल वाटते. 

किशोरी आमोणकर यांची गाजलेली गाणी : 

  • अवघा रंग एक झाला, 
  • बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,
  • माझे माहेर पंढरी, 
  • हे श्यामसुंदर राजसा,
  • अवचिता परिमळु, 
  • कानडा विठ्ठल
  • अवघा तो शकुन, 
  • जनी जाय पाणियासी,
  • जाईन विचारित रानफुला, 
  • पडिलें दूरदेशीं, 
  • पाहतोसी काय आता पुढे, 
  • मी माझें मोहित राहिलें, 
  • या पंढरीचे सुख, 
  • सोयरा सुखाचा विसांवा

पूर्वायुष्य
मुंबई येथे १९३१ मध्ये किशोरीताईंचा जन्म झाला. प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर म्हणजे त्यांच्या आई, आणि वडील माधवदास भाटिया. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरीताईंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.


सांगीतिक कारकीर्द
किशोरीताईंनी १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' (१९६४) साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. 

कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जात होते. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.

पुरस्कार :
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1985
5पद्मभूषण पुरस्कार, 1987
संगीत सम्राज्ञी पुरस्कार, 1997
पद्मविभूषण पुरस्कार, 2002
संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, 2002
संगीत नाटक अकादमी फेलोशिप, 2009

शिष्य

माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com