अशी बोलते माझी कविता (गणेश आघाव)

गणेश आघाव, पुणे (९११२४७९९७४)
रविवार, 2 जुलै 2017

विठोबा...

विठोबा,
उन्हानं करपलंय शेत
पायांना पडल्यात भेगा
रक्‍ताळलयही कुठं कुठं
अन्‌
या ग्लोबल वर्तमानात
चेंजेस झाले आहेत मातीत!
स्वीकारत नाही ती
कुठलंच रासायनिक खत किंवा बी

पूर्वी कसा बांधावरच
घट्ट उभा असायचास तू
सऱ्या-वरंबे
ओढलेल्या रानात
बाप तिफणीवर करायचा पेरणी
अन्‌
तरारून यायची पिकं वर

आताशा
मातीपरीक्षण करूनदेखील
हाती लागतच नाही
हवा तसा रिझल्ट!

विठोबा...

विठोबा,
उन्हानं करपलंय शेत
पायांना पडल्यात भेगा
रक्‍ताळलयही कुठं कुठं
अन्‌
या ग्लोबल वर्तमानात
चेंजेस झाले आहेत मातीत!
स्वीकारत नाही ती
कुठलंच रासायनिक खत किंवा बी

पूर्वी कसा बांधावरच
घट्ट उभा असायचास तू
सऱ्या-वरंबे
ओढलेल्या रानात
बाप तिफणीवर करायचा पेरणी
अन्‌
तरारून यायची पिकं वर

आताशा
मातीपरीक्षण करूनदेखील
हाती लागतच नाही
हवा तसा रिझल्ट!

विठोबा...
सगळीकडंच सुरू आहेत
शेतकऱ्यांच्या अंतहीन हाल-अपेष्टा
बेतलंय त्यांच्या जिवावरच
रानभर...मनभर

कुठं आहेस तू....?