अशी बोलते माझी कविता (कैलास दौंड)

कैलास दौंड, ९८५०६०८६११
रविवार, 21 मे 2017

वाचवणं महत्त्वाचं

 

शेतकऱ्यानं करावी अशी
एकच गोष्ट बिंबवली जाते
सतत मनावर त्याच्या

 

वाचवणं महत्त्वाचं

 

शेतकऱ्यानं करावी अशी
एकच गोष्ट बिंबवली जाते
सतत मनावर त्याच्या

 

त्याला दिले जातात
शेतीवरचा भार हलका करण्याचे सूचक संदेश
त्याला दाखवलं जातं आमिष
आत्महत्येनंतर मिळणाऱ्या लाखभर रुपयांचं
कर्ज, सबसिड्या, वीजबिलमाफी, खत-बियांची मुबलकता
रोजंदारीनं काम करण्याचं
आणि त्याबदल्यात आयात केलेला गहू
मिळवण्याच्या योजना
सतत ओतल्या जातात त्याच्या कानात
कारण,
मेंदूला कळावं की, या सगळ्यांची तुला खूपच गरज आहे!
तुझ्या शेतातलं धान्य तर तुला खायलाही
शिल्लक राहणार नाही
ज्या आशेनं पेरतोस घाम
एखादा छदामदेखील तुला उरणार नाही
म्हणून रोजगाराची हमी देताहेत ते!

शेती करायची असेल तर,
ते बिंबवत असलेल्या गोष्टी नीट समजून घे
आणि
दाखव जगाला की
सुचवण्यापेक्षा वाचवणं किती महत्त्वाचं असतं ते !

सप्तरंग

सप्टेंबर 1981पासून दरवर्षी जगभर संयुक्त राष्ट्राच्या वतीने 'जागतिक शांतता दिन' साजरा करण्यात येतो. 'शांततेसाठी आपण : सगळ्यांचा...

05.03 AM

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे देशाच्या राजकारणातील एक पारदर्शी, पण गूढ व अत्यंत वादग्रस्त...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

अतिवेगवान असा बदल आणि प्रगती हीच ज्याची खूण बनली आहे. अशा एकविसाव्या शतकात मध्ययुगीन सोवळ्या-ओवळ्याच्या खुळचट कल्पनांचे मेधा खोले...

सोमवार, 18 सप्टेंबर 2017