मुक्काम अमेठी : काँग्रेसच्या ढासळलेल्या घरी...

मुक्काम अमेठी : काँग्रेसच्या ढासळलेल्या घरी...
मुक्काम अमेठी : काँग्रेसच्या ढासळलेल्या घरी...

अमेठी आणि गांधी नेहरू कुटुंब यांचं नातं अतूट वाटत होतं; पण आता हे असंच राहील का याबद्दल मला तरी शंका आहे. दोन कारणं. एक म्हणजे गांधी परिवाराचा स्वतःचा असा कमी होत चाललेला मतदार. अगोदरच राजेशाही थाटात जगलेल्या इथल्या राजे महाराजांनंतर ही लोकशाही आडून येणारी आधुनिक सरंजामशाही व्यवस्था जनता आता मानत नाही आणि दुसरं असं की विकासाला कायमच दुरावलेला इथला मध्यम वर्ग आणि मागास - अति मागास समुदाय यांच्या महत्वकांक्षांना खतपाणी घालणारे भाजपसमर्थक नेतृत्व तसेच त्यांच्या जोडीला समाजवादी पार्टीने आपली केलेली व्यूहरचना.

अमेठी मध्ये बऱ्याच नागरी समस्या आहेत. ज्यांच्या हाती सत्तेची दोरी सदासर्वदा राहिली आणि जे येथून कायम निवडून आलेत त्यांनी का इथल्या व्यवस्थेत काही बदल केले नसतील? फैजाबाद - रायबरेली हा रस्ता अमेठी मतदारसंघातून जातो. हा रस्ता दोन महत्वाचे जिल्हे जोडतो आणि याची अवस्था बाकी व्यवस्थेबद्दल सांगून जाते.

अमेठी आयआयटी अलाहाबाद येथे हलविली गेली. जगदीशपुर या गावात येणारी पेपर मिल भाजपाने रत्नागिरी येथे पाठविली. लोक उदाहरणं तर अनेक देतात आणि आपल्या नजरेलाही काही गोष्टी स्पष्ट दिसतात. नंदुरबार येथे 1998 मध्ये बरी स्थिति असेल इतकी वाईट स्थिति नागरी समस्यांची आहे. शिक्षण व्यवस्था रायबरेली अणि अमेठी येथे उत्तम आहे. पण त्याचे पुढचे पाऊल रोजगार निर्माण करण्यात यशस्वी नाही. तिथली व्यवस्था असलेल्या साखर कारखान्यांना बंद करून बसली आहे.

गेल्या काही वर्षांत समाजवादी आणि भाजप यांची एक पक्की रणनीति होती की काँग्रेसच्या प्रभावखाली असलेली अमेठी - रायबरेली ही संस्थानं खालसा व्हावीत. 2014 च्या निवडणुकीत स्मृति इराणी यांना राहुल गांधीच्या विरोधात उभे करून वातावरण तयार करून झालंय. आता जेव्हा वेळ येईल तेव्हा राहुल गांधी नक्कीच नवीन मतदारसंघ शोधतील किंवा या मतदारसंघात इतर पक्षीय तडजोडी कराव्या लागतील. भाजपने आपला मतदार फिक्स केलाय आणि तो जपलासुद्धा आहे. मोदी अजून रायबरेली किंवा अमेठीत आले नाहीत. पण कनेक्ट आहे. मोदी आणि टीमने लोकांच्या महत्वकांक्षांना हात घालून त्यांना जागं केलंय. सरकार येईल किंवा नाही येणार पण लोक आता सर्वांना प्रश्न मात्र जरूर विचारतील किंवा मग २०१९ ला भाकरी पलटवतील.

गायत्री प्रसाद प्रजापति हा माणूस मुलायम सिंग यांनी पोसला. लट्ठेदार ते कॅबिनेट मंत्री असा याचा प्रवास आहे. 2002 मध्ये जो BPL कार्डधारक असतो तो 2012 मध्ये कॅबिनेट मंत्री होतो अणि आपले प्रस्थ निर्माण करतो. उत्तर प्रदेशतल्या एकूणच कॉम्पिटिशनमध्ये हा माणूस इतकी प्रगती करतो म्हणजे काहीतरी खासच बात आहे नं!

गोष्ट अशी आहे की यादव अणि कुर्मी यांचा मोठा सपोर्ट ग्रुप समाजवादी सरकारकडे बराच काळ राहिला. पण बाकी समुदाय यांच्या सरकार अणि पक्षापासून दुरावू लागले. मग मागणी केली गेली ती अतिमागास अशा 17 जातिसमुहांना एससी कॅटेगरीमध्ये टाकण्याची आणि ही मागणी प्रजापति मांडतात. जेव्हा समाजवादी सरकार आलं तेव्हाच दोन वर्षांत कुंभार अणि प्रजापति या मातीची भांडी बनवीणाऱ्या दोन समुदायांना एससी स्टेटस दिलं गेलं आणि ती घोषणा केली गायत्री प्रसाद प्रजापति यांनी. लोकानुयायी राजकारणाचे एक पापी पितर. गायत्री प्रसाद प्रजापति या माणसाने ऐकून 4 वेळ मंत्रीपदाची स्वतंत्रपणे शपथ घेतली. फक्त 4 वर्षांत. भाजपकडे जाणारा अतिमागास ओबीसी समूह टिकवून ठेवण्यासाठीचा हा मुलायम रस्ता!

अमेठीच्या या विधानसभा मतदार संघात विशेष लोक निवडणूक लढवित आहेत. गायत्री प्रसाद समाजवादी पक्षाकडून, अमिता सिंह (राजाची पहिली पत्नी) काँग्रेसकडून आणि दूसरी पत्नी गरीमा सिंह भाजपकडून. प्रजापतिंवर बलात्कारचा गुन्हा आहे. अटक कधीही होऊ शकते. खंडणी-मारामारी आदी गुन्हे आहेतच. पक्षाची अणि आपली इमेज यावर किमान निवडणुकीत तरी परिणाम होऊ नये म्हणून अखिलेश ही अटक टाळत असणार.

अमेठीतत कुणी खुलेपणानं बोलत नाही. बोलतात फक्त तरुण. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जेवणारी मुलं गाठली. त्यांच मत आज मॅटर करणार नसेलही कदाचित; पण भविष्याचा आरसा चुणूक दाखविणारा आहे आणि स्पष्ट असणार आहे...मोदी मोदी मोदी !! येथे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाचे दिवस फार बरे नाहीत हे मात्र नक्की.

अमेठीत अजूनही इथल्या धोबी समाजातील एक व्यक्ती अगोदर मतदान करायला जातो. मग इथले राज परिवारचे सदस्य मतदानाला जातात अणि मग इतर जनता !! (हा किस्सा ऐकीव आहे. सत्यता मी पडताळून पाहिलेली नाही)

लोकशाही माता की जय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com