फीचर फोन ते स्मार्ट फोन (कृपादान आवळे)

krupadan awle technodost article in saptarang
krupadan awle technodost article in saptarang

स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून असतात. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रवासाविषयी...

सध्या मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानात झपाट्यानं बदल होताना दिसत आहेत. सर्वात पहिल्यांदा फीचर फोनची (बेसिक फोन) निर्मिती करण्यात आली. त्यात फक्त कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा देण्यात आली होती. मात्र, फीचर फोनची जागा आता स्मार्ट फोननं घेतली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात माणसाचं जीवनमानही बदलत चाललं आहे. स्मार्ट फोनच्या तंत्रज्ञानात बदल होत असल्यानं मोबाईल वापरणाऱ्यांना विविध सेवा-सुविधा मिळत आहेत. मोबाईल फोन ऑपरेट होण्याचं मुख्य कारण म्हणजे ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस). या ऑपरेटिंग सिस्टिममध्येही बदल केले जात आहेत.

-फीचर फोननंतर बाजारात आलेल्या फोनमध्ये कॅमेरा, एम 3 ची सुविधा देण्यात आली. मात्र, यातही मोठे बदल होऊन स्मार्ट फोन सादर करण्यात आला. या स्मार्ट फोनमध्ये आता कॅमेरा, एम3सह, व्हिडिओ रेकॉर्डिंग, जीपीएस, इंटरनेट, सोशल मीडियासाठी आवश्‍यक तंत्रज्ञानासह इतर विशेष फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दैनंदिन कामं करताना स्मार्ट फोन हा आता अविभाज्य घटक बनत चालला आहे. स्मार्ट फोनशिवाय माणूस तासभरही राहू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यापूर्वीच्या मोबाईल फोनमध्ये अशा सुविधा मिळत नसत. मात्र, स्मार्ट फोनमधल्या विविध सुविधांमुळं माणूस खऱ्या अर्थानं "स्मार्ट' होत आहे. सध्याच्या स्मार्ट फोनमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. मात्र, हे स्मार्ट फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवर (ओएस) चालतात, त्यावर त्यांची फीचर्स अवलंबून आहेत.

अशाच ऑपरेटिंग सिस्टिमची माहिती घेऊ या.
1) बडा (सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स) : "बडा' ही ओएस सिस्टिम सॅमसंग मोबाईलसाठी वापरण्यात येते. "बडा' ओएस सर्वप्रथम 2010 मध्ये सादर करण्यात (लॉंच करण्यात) आलं होतं. या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारा "सॅमसंग वेव' हा पहिला स्मार्टफोन आहे. बडा ओएसच्या माध्यमातून मल्टिपॉइंट टच, 3 डी ग्राफिक्‍स आणि ऍप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉलेशनची सुविधा मिळते.

2) ब्लॅकबेरी ओएस : ब्लॅकबेरी ओएस ही ऑपरेटिंग सिस्टिम ब्लॅकबेरी मोबाईलसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ओएसच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट एक्‍स्चेंज, लोटस डोमिनो, ई-मेल इत्यादी सेवांचा लाभ घेता येतो.

3) आयफोन/ऍपल : ऍपल कंपनीची आयफोन ही ऑपरेटिंग सिस्टिम फक्त आयफोनच्या डिव्हाइससाठी सादर करण्यात आली. त्यानंतर आता ही सिस्टिम आयफोन, आयपॅड, आयपॅड 2 आणि आयपॅड टचसाठीही सुरू करण्यात आली आहे.

4) मिगो ओएस (नोकिया आणि इंटेल) : ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम दोन मोबाईलसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. माईमो (नोकिया) आणि मोबिन (इंटेल). मिगो हे ऑपरेटिंग सिस्टिम स्मार्टफोन, नेटबुक, टॅब्लेटमध्ये वापरली जाते.

5) पाम ओएस (गारनेट ओएस) : पाम ऑपरेटिंग सिस्टिम ही नवं पोर्ट वाढवणं, नवे प्रोसेसर वाढवणं, यासाठी निर्माण करण्यात आली आहे.

6) सिम्बियन ओएस (नोकिया) : सिम्बियन मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ही मुख्यत: नोकिया मोबाईलसाठी दिली गेली आहे. नोकियाच्या विविध मोबाईलमध्ये सिम्बियन ओएसचा वापर करण्यात आला आहे.

7) विंडोज मोबाईल : "विंडोज मोबाईल' ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम मायक्रोसॉफ्टच्या फोनमध्ये देण्यात आली आहे. टचफोन किंवा विना टचफोनमध्ये ती देण्यात आली आहे. लिनक्‍स किंवा विंडोज्‌ ऑपरेटिंग सिस्टिम आपल्या डेस्कटॉप आणि लॅपटॉपला नियंत्रित करता येऊ शकते, तसंच ही ऑपरेटिंग सिस्टिम मोबाईल फोनमध्येही चालते.

8) अँड्रॉइड ओएस (गुगल) : अँड्रॉइड ओएस ही एक मोबाईलमधली ऑपरेटिंग सिस्टिम असून, ती स्मार्टफोनसाठी वापरली जाते. 1.0 पासून ते 9 पर्यंत अँड्रॉइड व्हर्जनचे स्मार्टफोन सध्या बाजारात आहेत.

1) अँड्रॉइड (1.0) : 1.0 हे अँड्रॉइडचं पहिलं व्हर्जन असून, 23 सप्टेंबर 2008 ला ते सादर करण्यात आलं.
2) पेटिट फोर (1.1) : पेटिट फोर हे 1.1 व्हर्जन असलेलं अँड्रॉइड (सादर केलं गेल्याची तारीख ः 9 फेब्रुवारी 2009)
3) कपकेक (1.5) : 1.5 व्हर्जनचं कपकेक (27 एप्रिल 2009)
4) डोनट (1.6) : 1.6 व्हर्जनचे डोनट वर्जन असलेलं अँड्रॉइड (15 सप्टेंबर 2009)
5) इक्‍लेअर (2.0-2.1) : इक्‍लेअर 2.0-2.1 हे अँड्रॉइड व्हर्जन (26 ऑक्‍टोबर 2009)
6) फ्रोयो (2.2-2.2.3) : फ्रोयो अँड्रॉइड व्हर्जन (20 मे 2010)
7) जिंजरब्रिड (2.3-2.3.7) : जिंजरब्रिड हे अँड्रॉइड व्हर्जन 2.3 ते 2.3.7 वर चालतं (6 डिसेंबर 2010)
8) हनिकॉम्ब (3.0-3.2.6) : हनिकॉम्ब वर्जन असलेलं अँड्रॉइड (22 फेब्रुवारी 2011)
9) आईस्क्रीम सॅंडविच (4.0-4.0.4) : 4.0-4.0.4 अँड्रॉइड व्हर्जन असलेलं आईस्क्रीम सॅंडविच (18 ऑक्‍टोबर 2011)
10) जेली बिन (4.1-4.3.1) : अँड्रॉइड (9 जुलै 2012)
11) किटकॅट (4.4 -4.4.4) : (31 ऑक्‍टोबर 2013)
12) लॉलीपॉप (5.0 - 5.1.1) : अँड्रॉइड व्हर्जन (12 नोव्हेंबर 2014)
13) मार्शमेल्लो (6.0 - 6.0.1) : अँड्रॉइड (5 ऑक्‍टोबर 2015)
14) नॉगट (7.0 - 7.1.2) : (22 ऑगस्ट 2016)
15) ओरिओ (8.0-8.1) : अँड्रॉइड (21 ऑगस्ट 2017)
16) अँड्रॉइड पी (9) : 9 व्हर्जन. सध्या सुरू असलेलं अँड्रॉइड व्हर्जन (सादर केलं गेल्याची तारीख ः 8 मे 2018).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com