अशी बोलते माझी कविता (मनीषा निपाणीकर)

मनीषा निपाणीकर, ८३७९८९९१६१, लातूर
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कोरी वही !

बाईचं आयुष्य म्हणजे वही कोरी...
कसं लिहायचं? का लिहायचं?
कुणी लिहायचं? केव्हा लिहायचं ?
हे सगळं नसलं तिला माहीत जरी...
जे लिहिलं जातंय ते ती सोशिकपणे सहन करते
धारदार शब्दासंगे कधी खरखरही करते!
वडिलांचं सगळं भावासाठी ठेवते
नवऱ्याची जहागिरी मुलांसाठी राखते
समंजसपणा, समजूतदारपणा
तिच्या फ्रंट पेजलाच असतो...!

कोरी वही !

बाईचं आयुष्य म्हणजे वही कोरी...
कसं लिहायचं? का लिहायचं?
कुणी लिहायचं? केव्हा लिहायचं ?
हे सगळं नसलं तिला माहीत जरी...
जे लिहिलं जातंय ते ती सोशिकपणे सहन करते
धारदार शब्दासंगे कधी खरखरही करते!
वडिलांचं सगळं भावासाठी ठेवते
नवऱ्याची जहागिरी मुलांसाठी राखते
समंजसपणा, समजूतदारपणा
तिच्या फ्रंट पेजलाच असतो...!

नव्या-जुन्या आठवणींची असते मनी दाटी
कंटाळवाण्या पानावर सहज रेखाटते ती वेलबुट्टी
हे आयुष्य तिचंच असतं
पण लिहिणारा असतो दुसराच कुणी!
हे लिहिणारे असतात
कधी वडील
कधी भाऊ
कधी नवरा
तर कधी मुलं
म्हणूनच तर कदाचित
ती होत नसेल ना खिळखिळी ?

वरचं वेष्टन कितीही सुंदर असलं
तरी मधली मळकी पानं
तिची चित्तरकथाच सांगत असतात
‘तू लढ, तू लढ’ म्हणणारे कधी कुठं सोबत असतात ?
तिला जरी वाटलं
हळूच घ्यावी भरारी
आपलीच माणसं पंख छाटतात !

Web Title: manisha nipanikar's poem

टॅग्स
फोटो गॅलरी