महिला दिन सेलिब्रेशन संपताना हे नक्की बघाच...

marathi news article womens day short film women empowerment
marathi news article womens day short film women empowerment

आपण मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरी' या म्हणीनुसार हे फॉरवर्ड विचारही केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित आहेत. प्रत्यक्षात हे विचार अंमलात आणण्यात आपण बरेच पिछाडीवर आहोत. या खऱ्या परिस्थितीला पारंपरिक माध्यमे (media) फार कमी मांडताना दिसत असली तरी काही लघुपट (short films) सारख्या माध्यमातून बरेच उघड आणि स्पष्टपणे एखाद्या कुटूंबात आहे ती परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कुटूंबच नाही तर समाजातील इतरही ठिकाणी महिलेचा व्यक्ती म्हणून जगण्याचा संघर्ष सुरुच आहे. महिला आणि पुरुष असे वर्गीकरण लहानपणापासून आपल्या मनावर भारतीय समाज पध्दतीने बिंबवले आहे. त्यामुळे वागण्या-बोलण्याला सीमा, परीघ, पध्दत रुजवल्या गेल्या. किंबहुना पितृसत्ताक पध्दतीने त्या रुजवून घेतल्या. या सगळ्या परिस्थितीचा सार असलेल्या अशाच काही कहान्या ज्या माणूस म्हणून स्त्री आणि पुरुष दोहोंनी बघव्यात... 

नयनताराज् नेकलेस -
नयनतारा (कोकणा सेन) आणि अलका (तिलोत्तमा शोम) यांच्यातील मैत्री या लघुकथेतून मांडली आहे. हायक्लास आणि मिडलक्लास अशा दोन वेगळ्या टोकाच्या या मैत्रीणी एकत्र येतात आणि एकमेकांची लाईफस्टाईल सुक्ष्मपणे निहाळतात. पण एकमेकींना कळू न देता. बाईची लाईफस्टाईल कोणतीही असो तिच्या वाट्याला आलेले भोग कमी अधिक प्रमाणात शेवटी सारखेच. हे या शॉर्ट फिल्ममधून आपल्याला दिसून येईल. 


ज्युस - 
महिला आणि पुरुष हे शरिर रचनेने दोन वेगळे घटक आहेत. हे नैसर्गिक सत्य बाजूला ठेवले तर दुसरे कोणतेही कारण महिला आणि पुरुष असा भेदाभेद करायला योग्य ठरत नाही. पण सततहा भेदाभेद करायला कारणं निर्माण करण्यात आली आहेत आणि सगळ्यात आधी याचा बळी ठरतात ती म्हणजे घरगुती बाई. घरातली स्त्री जी नोकरी करत नाही वा व्यवसाय करत नाही तिचा जन्म केवळ घरातल्या कामांसाठीच झालाय की काय अशा अर्थाची वागणूक आजही बऱ्याच घरात 'हाऊसवाईफ'ला मिळते. शेफाली शाह यांनी मंजू नावाचे साकारलेले पात्र अशाच एका 'हाऊसवाईफ'ला (कामापेक्षा आजूबाजूला लोक जास्त असूनही) सतत करावी लागणारी धडपड साकारली आहे. कळत नकळत बाईला रोबोट सारखं वागवणारे आपणही असूच हे ही शॉर्ट फिल्म बघितल्यावर लक्षात येईल.

नेक्ड -
कल्की कोचलीन आणि रिताभरी यांची भूमिका असलेली या शॉर्ट फिल्ममध्ये रेप, अत्याचार आणि स्त्रीकडे बघण्याचा भारतातील एकुणच दृष्टीकोन या सगळ्यावर भाष्य केले गेले आहे. एक सर्वपरिचित चेहरा, तिचं काम आणि तिच्या प्रोफेशनमध्ये केवळ स्त्री आहे म्हणून करावी लागणारी अस्तित्त्वाची खटाटोप हे एकीकडे. आणि दुसरीकडे एक जर्नालिस्ट जिला एका अशावेळी तिची मुलाखत घ्यायची गरज पडते जेव्हा आपली नवीन नोकरी आणि आपल्या आत सुरु असलेला विचारांचा संघर्ष यातून ती स्वतःची करत असलेली मानसिक तयारी. बोल्डनेस म्हणतो खरं आपण, पण तो फक्त म्हणण्यापुरतीच मर्यादित राहुन बसलाय हेच खरं. सोशल मिडीया सारखा ओपन माइंडेड स्त्रोत वापरणाऱ्याचे माइंड किती कुजलेले आहेत याची परिस्थिती दर्शवणारी 'नेक्ड' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा. 

लाईफ आफ्टर -
घर-संसारातील कामकाज आणि नोकरी करुन घर सांभाळत असतील तर अजूनच धापवळ सोसणाऱ्या महिलांचं बऱ्याच वेळा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. 'लाईफ आफ्टर' या शॉर्ट फिल्ममध्ये स्तन कॅन्सरशी लढताना एका बाईची शारिरीक दुखण्याच्या संघर्षाबरोबरच मानसिक विषणत्तेवरील मात याविषयी व्यक्त केले गेले आहे. अभिनेत्री विद्या मालवदे यांनी ही भूमिका निभावली आहे. 

'हर - लेट द व्हॉईस बी युवर्स' - 
कामाच्या जागी कित्येकवेळा कित्येकजागी विनयभंग वा तत्सम् घटना घडल्याच्या आपण ऐकल्या असतील. काम नवीन आहे, दुसरीकडे काम मिळणार नाही, तेवढ्या पगाराची दुसरी नोकरी सापडणार नाही, घरची आर्थिक गरज आहे हे अन् अशा कित्येक कारणांमुळे मुली कामाच्या जागी होणाऱ्या अत्याचाराला बळी पडतात. पण याविरुध्द बोलणं आता किती गरजेचं झालं आहे हे या शॉर्ट फिल्ममधून उत्तमरित्या मांडण्यात आलं आहे. मुळात स्त्रीकडे वाईट नजरेनं बघणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत दिलेले उत्तर अधिक योग्य ठरते हे यातून कथित करण्यात आले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com