पंख सकारात्मतेचे : सण- उत्सवांमागील सकारात्मकता

Diwali
Diwaliesakal

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल

प्रथा परंपरांच्या (Traditional) या मालिकेत आतापर्यत आपण आपल्या पूर्वजांनी कोणत्या हेतूने त्या परंपरा सुरू केल्या याबाबत पाहिले. आपल्या भारतीय संस्कतीत (Indian culture) येणारे विविध सणांमागेही अशीच पार्श्‍वभूमी असावी का याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आजच्या भागात आपण दिवाळी आणि लग्नसराईचा काळ नेमका कसा ठरविला गेला असावा आणि का यामागील सकारात्मक भावना आणि विज्ञानही नेमके काय आहे याविषयी...(positivity behind festivals Saptarang MArathi Article nashik news)

प्रथांच्या या मालिकेत आपण अजून एक अभ्यास करू या तो म्हणजे सणांचा. आपण कधी कोणी क्वचितच विचार केला असेल, की आपले जे सण आहेत, ते कोणत्या दिवशी दिवसांमध्ये यावेत. त्याकाळी कोणी कसे ठरविले असेल, हे कोणी तरी ठरविले असेल एवढे मात्र नक्की. जसा मानव उत्क्रांतीतून निर्माण झाला तशी काही सण वारांची निर्मिती उत्क्रांतीतून झाली नाही हेही तेवढेच नक्की. ही सगळी सण वार आपल्या पूर्वजांनी कुठल्या विशिष्ट दिवसांमध्ये करायचे, हे त्याबरोबरच त्यात्या सणा वाराला कुठल्या प्रकारचे गोड-धोड करायचे, कुठल्या कुठल्या पूजा करायच्यात? घर कसे सजवायचे? आपला पोशाख कसा असावा अशा अगदी बारीक-सारीक गोष्टी कशा करायच्या याचा संपूर्ण अभ्यासपूर्ण अर्थातच आपण चर्चा करीत असलेलं वेगवेगळे विज्ञान त्यात समाविष्ट करून आपल्याला प्रथा परंपरेच्या रूपात ही सण वार आखून दिलेली आहेत. जी सगळी आपण आजही साजरी करीत असतो. आधी आपण या सणा वारंवरती एक नजर टाकूया.

मराठी वर्षाप्रमाणे आपण ही यादी बघूया. गुढीपाडवा, रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्री, दीपावली, मकर संक्रांत, होळी इत्यादी इत्यादी आपण या यादीमध्ये मोठे मोठे सण घेतलेले आहेत. यातील एखाद-दुसऱ्या सणावरती प्रातिनिधिक स्वरूपात नजर टाकूया म्हणजे आपण सर्वांच्या लक्षात प्रत्येक सणाबद्दल आपोआप येईलच.

Diwali
ऋणानुबंध पंढरपूरच्या वारीचे

महत्त्वाचा सण म्हणजे ज्याला आपण सणांचा राजा म्हणतो तो म्हणजेच दीपावली. आता हा सण कधी येतो हे खूपच महत्वपूर्ण आहे. यामध्ये पूर्वजांची दूरदृष्टी सगळ्या प्रकारच्या विज्ञानांचा त्यांचा अभ्यास हे सर्व आपल्या लक्षात येईल. हा सण पावसाळ्याबरोबर संपल्यावर येतो, ज्यावेळी शेत शिवारामधली खरिपाची पिके कापून झालेली असतात. शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे आलेले असतात आणि आपण आजही आपला देश शेतीप्रधान म्हणतो त्यावेळी तर आजच्या पेक्षाही कितीतरी जास्त पट लोक शेतीवरती अवलंबून होते. खरिपाचा हंगाम संपून शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे असावयाचे/ असतात. वातावरण अगदी स्वच्छ सुंदर असते. हिवाळ्याची सुरुवात व्हायची असते. ना तर जास्त उन, ना तर जास्त थंडी आणि पावसाळा तर संपलेलाच असतो. असे स्वच्छ सुंदर वातावरण यावेळी असते. त्या काळी पडत असलेल्या जोरदार पर्जन्यमानामुळे मातीची घरे लवकर गळायला लागायची, त्यामुळे घराच्या भिंतींना ओलावा येऊन बुरशी पकडी. अशा घराघरांमध्ये कुंद असे वातावरण राहत असे.

जे की आरोग्यासाठी घातक असायचे अन हेल्दी एन्व्हायरमेंट असे ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आणि मग दीपावलीच्या निमित्ताने छानशी रंगरंगोटी घराघरांमध्ये केली जाते. ज्याच्याने घर घरातील वातावरण सुंदर तर बनतेच सोबत आरोग्यदायी ही बनते. रंग दिल्यामुळे पेस्ट कंट्रोलही आपोआपच होऊन जात असे. रंग रंगोटीपासून आकाशकंदीलपासून फटाके सर्व गोष्टींची तयारीही जोरात असते.

Diwali
कान्सची कोरडी वारी!

घरातील प्रत्येक व्यक्तीला नवीन कपडे केले जातात अनेक घरांमध्ये नवीन वाहने नवनवीन गोष्टींची खरेदी केली जाते . थोडक्यात काय आपण जर नीट विचार केला तर संपूर्ण समाजाचा अर्थकारण जे की एकमेकांवर अवलंबून असते पण ज्याची खरी सुरुवात त्याकाळी शेतीपासून होत असे ते अर्थ कारण खूप जोरात फिरायला लागायचे या निमित्ताने अनेक लोकांना कामधंदा देखील मिळायचा जसे की रंग काम करणारे, साफसफाई करणारे, फटाके बनविणारे, त्यांचा व्यापार करणारे. किराणा मालाचा धंदा तर सगळ्यात जोरात चाललेला असायचा आणि आजही चाललेला असतो. कपड्यांच्या व्यापारापासून तर कपडे शिवणाऱ्या शिंप्यापर्यंत. पूजा सांगणारे भटजी असे कितीतरी उदाहरणे देता येतील. यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी देखील जोपासली जावयाची. भाऊबिजेच्या निमित्तानं बहीण भावांची भेट व्हायची. भाऊबिजेला लेक बहिण माहेरी यावयाची. दीपावलीनिमित्त अनेक प्रकारच्या पूजा अर्चा होतात. त्यातून सगळ्यांना मनशांती मिळून पुढे जाण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. असा हा प्रकाशाचा पर्व असलेला दीपावलीचा सण.

एव्हाना वरील विवेचनावरून आपल्या सर्वांच्या नक्कीच लक्षात आले असेल की आपले पूर्वज किती हुशार किती दूरदृष्टी असलेले काळाची पावले ओळखणारे आरोग्याची चिंता वाहणारे आपल्या कामाची हिताची गोष्टी बरोबर धर्मरूढी परंपरेच्या कॅप्सूलमध्ये अत्यंत सकारात्मक टाकत होते. यात काहीच शंका नसावी... किती विचार पूर्वक यांनी दीपावलीसाठी दिवस निवडले, किती विचारपूर्वक दिवाळीतील आठवडाभर वेगवेगळ्या पूजा अर्चा, वेग वेगळे कार्यक्रम ,किती सुंदर विचारपूर्वक सर्व काही योग्य ठिकाणी योग्य वेळी बसविलेले म्हणजेच प्रकाश पर्व दीपावली.

विवाहाचा काळ मोकळेपणाचा

आता एक छोटसा पण अत्यंत वेगळा पूर्वजांच्या दूरदृष्टीची सकारात्मकतेची साक्ष देणारा विषय घेऊ या लग्नांचे मुहूर्त. मी जेव्हा या विषयांमध्ये सखोल अभ्यास करायला लागलो त्यावेळी मला खरोखरच खूप आश्चर्य वाटायला लागले, की खरोखरच सलाम आहे आपल्या पूर्वजांना. त्यांच्या दूरदृष्टीला त्यांच्या सकारात्मकतेला. सगळ्यात पहिले त्यांनी विचार केला असेल तो म्हणजे अर्थशास्त्राचा की कोण कोणत्या वेळी लोकांकडे पैसा असणार आहे त्यानंतर त्यांनी विचार केला असणार म्हणजे त्यावेळी आणि आजही ज्याच्या वरती आज आपले जीवनमान अवलंबून आहे ते म्हणजे शेती आणि शेतीतील पीक पाणी. ज्या ज्या वेळी पीकपाणी हातात आलेले असेल. ज्यावेळी शेतात फारशी कामे नसतील बरोबर त्या त्या वेळी येणारे मुहूर्त. ज्या वेळी वातावरण स्वच्छ सुंदर असेल ती वेळ मुहूर्त आणि त्यामुळेच आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या हवामानामध्ये आपल्याला वेगवेगळे मुहूर्त सापडतील.

Diwali
दुनियादारी : थांबशील?

या विषयाला आपण थोडे समजून घेऊ या. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये दीपावलीच्या पंधरा दिवसानंतर साधारणता लग्नकार्य तुलसी विवाहापासून सुरू होतात. अंदाजे महिना-दोन महिने ते मुहूर्त चालतात. रब्बी हंगामाचे पीक पाणी काढायची वेळ येते आणि बरोबर लग्नाचे मुहूर्त बंद होतात. एकदा पीक पाणी काढून झाले की बरोबर दोन अडीच महिने लग्नकार्य चालतात. आणि एकदा की पावसाळा सुरू झाला मुहूर्त बंद हे झाले महाराष्ट्रातील हेच आपण उत्तरेला किंवा उत्तर पूर्व राज्यांमध्ये जाऊया जसे की कश्मीर लद्दाख सिक्किम थोडक्यात जेथे-जेथे साधारणता ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत बर्फ पडतो तेथे कुठेही या महिन्यांमध्ये लग्नाचे मुहूर्त नसतात लग्नच काय इतर कुठल्याही महत्त्वाच्या कामांचे मुहूर्त नसतात कारण तिथे ज्या वेळेला बर्फ पडत असतो त्यावेळी तिथले जीवनमान देखील बऱ्या पैकी गोठलेले असते कुठल्याही प्रकारच्या सेवा मिळणं या काळामध्ये दुरापास्त असते आणि आपल्याकडे मात्र ह्याच दिवसांमध्ये खूप छान मुहूर्त असतात बघा हा विरोधाभास हेच आपण जसजसं दक्षिणेकडे सरकू तसा आपल्या इथल्या पेक्षा हे मुहूर्त काहीसे लवकर सापडतील एवढं नक्की आणि हेच आपण जसं जसे उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे सरकायला लागू त्यावेळेला आपल्याला आढळून येईल किं आपल्यापेक्षा इथले मुहूर्त उशीरा सापडतील म्हणजेच थोडक्यात काय त्याकाळी त्या त्या प्रदेशां मधले हवामान, पाऊस पाणी, पीक काढण्याची वेळ तेथील भौगोलिक परिस्थिती अशा अनेक बारीकसारीक गोष्टींचा आपल्या पूर्वजांनी अत्यंत सकारात्मक पणे विचारपूर्वक हे मुहूर्त लावून दिले आहेत एवढे नक्की

अशाच एका अत्यंत छोट्या पण त्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रथे बद्दल विचार करू या जुन्या काळी म्हणजे फार जुन्या नव्हे तर अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हणजे चाळीस पन्नास वर्षे अगोदर पर्यंत जर कोणी घरातून बाहेर जात असेल किंवा घरात बाहेरून येत असेल त्या त्या वेळी त्याच्या हातावर एक गुळाचा खडा ठेवायचे आणि सोबत पाण्याचा तांब्या भरून देत असे जाताना जो गुळाचा खडा दिला जायचा त्याला जैनांन मध्ये मंगलिक असं म्हणायचे म्हणतात. काय असेल बरे ही प्रथा ! अतिशय सोप्प आहे जाताना किंवा येताना त्याला एनर्जी सोबत हायड्रेशन दिले जाते जेणेकरून बाहेर कुठेही कामाला जाताना एनर्जी कमी पडू नये आणि बाहेरून येत असेल तर त्याचा आलेला थकवा निघून जावा कारण जुन्या काळी आजच्या एवढ्या खाण पानाच्या एवढ्या सुविधा नक्कीच उपलब्ध नव्हत्या एवढ्या हॉटेल्स नव्हत्या, म्हणून आपल्या पूर्वजांनी घेतलेली ही काळजी जिला रूढी प्रथेमध्ये टाकून दिलं .. तेही अगदी सकारात्मकतेने

----------

आपण आपल्या देशाच्या कुठल्याही राज्यांमध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये त्यांच्या प्रथा रूढी परंपरा यांच्यात डोकावून बघितले तर आपणा सर्वांच्या लक्षात नक्कीच येईल की त्याकाळी आपल्या पूर्वजांनी अत्यंत अभ्यासपूर्वक सकारात्मकतेने मेडिकल सायन्स, सोशल सायन्स, जिऑग्राफिकल सायन्स, ह्यूमन सायकॉलॉजी अशा अनेक गोष्टींचा समावेश रूढी-परंपरामध्ये करून त्यांना धर्माच्या कॅप्सूलच आवरण देऊन आपल्याला जास्तीत जास्त सगळ्या अर्थाने निरोगी ठेवण्याचा सकारात्मक प्रयत्न केलेला आहे. गरज आहे ती या सगळ्या गोष्टींचा डोळे उघडून अभ्यास करण्याचा, त्यातले मर्म समजून घेऊन त्यानुसार आपण चाललो पाहिजे ,ना की त्या गोष्टींचे अवडंबर करून पूर्वजांचा मूळ उद्देश धुळीला मिळवीता कामा नये..

(उत्तरार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com