अशी बोलते माझी कविता (प्रफुल कुलकर्णी)

प्रफुल कुलकर्णी, नांदेड (९९२१२७२४५६)
रविवार, 29 जानेवारी 2017

विस्थापित व्हावे...

    ताकावरती येते लोणी खूप घुसळल्यावर
    वाटेचा हमरस्ता होतो बरेच मळल्यावर

गांभीर्याने नकोस घेऊ ऊन्ह-सावलीला
दोघांचेही चित्र बदलते दुपार टळल्यावर

    कधी अता संपेल आरती, वाट बघे तीही...
    ज्योतीलाही खरेच येतो थकवा...जळल्यावर!

अंतर्मन अन्‌ वर्तमानही स्वच्छ स्वच्छ होते
गतकाळातिल सुखद क्षणांनी दुःख विसळल्यावर!

    परिश्रमाचा सुसाट वारू, लगाम धीराचा...
    घामालाही सुगंध येतो जरा निथळल्यावर

बंधन किंवा नियम पाळणे...कमीपणा कसला ?
आयुष्याची फरफट होते स्वैर उधळल्यावर!

विस्थापित व्हावे...

    ताकावरती येते लोणी खूप घुसळल्यावर
    वाटेचा हमरस्ता होतो बरेच मळल्यावर

गांभीर्याने नकोस घेऊ ऊन्ह-सावलीला
दोघांचेही चित्र बदलते दुपार टळल्यावर

    कधी अता संपेल आरती, वाट बघे तीही...
    ज्योतीलाही खरेच येतो थकवा...जळल्यावर!

अंतर्मन अन्‌ वर्तमानही स्वच्छ स्वच्छ होते
गतकाळातिल सुखद क्षणांनी दुःख विसळल्यावर!

    परिश्रमाचा सुसाट वारू, लगाम धीराचा...
    घामालाही सुगंध येतो जरा निथळल्यावर

बंधन किंवा नियम पाळणे...कमीपणा कसला ?
आयुष्याची फरफट होते स्वैर उधळल्यावर!

    पुढे चलावे घेण्यासाठी वेध भविष्याचा
    जुनाच रस्ता पुन्हा सापडे मध्येच वळल्यावर!

कठोरतेच्या निकषावरती सिद्धी ये दारी
दुधास लाभे खरी सुरक्षा पूर्ण उकळल्यावर

    कसे सुटावे समर्पणाचे पापभीरू कोडे?
    दोघांमधला अद्वैताचा दुवा निखळल्यावर

आशा आणिक नैराश्‍याचा लपंडाव सारा
ब्रह्मांडाचे दर्शन होते मेघ निवळल्यावर

    विस्ताराच्या स्वप्नासाठी विस्थापित व्हावे
    थेंबालाही समुद्र म्हणती...त्यात मिसळल्यावर!

सप्तरंग

शास्त्रीय संशोधनावरील खर्चाच्या अपुऱ्या तरतुदी, अशास्त्रीय गोष्टींचा प्रचार अशा विषयांकडे सरकार आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी परवा...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली का भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतचा वाद चिघळला असताना समाज दुभंगण्याची दुश्‍चिन्हे दिसू लागली...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017

गोरखपूर सिव्हिलमध्ये ऑक्सिजन संपला म्हणून साठ कोवळ्या जीवांचा बळी गेला. वाचून कोणीही सेन्सिटिव्ह माणूस सुन्न होईल, अशीच ही घटना...

सोमवार, 14 ऑगस्ट 2017