दिल्लीत होवो शिवरायांची महती सांगणारा 'नवोदय'...

shivaji-maharaj
shivaji-maharaj
महाराष्ट्रामध्ये आयुष्यातला महत्त्वपूर्ण काळ गेल्यानंतर अचानक एका वळणावर दिल्लीत पहिलं पाऊल पडलं तो दिवस हा आजचाच. त्यामुळ तो साहजिकच लक्षात राहण्यासारखा अन राहिलाही...

आपला गांव वा प्रांत सोडुन मराठी माणूस जात नाही असं म्हटलं जातं. दिल्लीमध्ये पाऊल ठेवल्यावर पुढील 2 वर्षांत गत 100 वर्षांपासून येथे राहणाऱ्या; तसेच 50-60 वा 70 वर्षांपासून वास्तव्याला असणाऱ्या कुटूंबांची माहिती मिळाली. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेबद्दलची व त्या द्वारे चालत असलेल्या सांस्कृतिक कार्याचीही माहिती मिळाली. मात्र कार्यक्रमांसाठी उपस्थित मराठीजनांची संख्या तोकडीच दिसत असे. उत्साहाने कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या 70 पेक्षाही जास्त वयाच्या आयोजकांचे कौतुक वाटायचे. पण तरुणांची उपस्थिति नगण्य जाणवली.

अशातच एका शिवजयंतीच्या कार्यकमाला मी मोठ्या उत्साहाने गेलो. पण या कार्यक्रमास बोटांवर मोजता येतील एवढीच उपस्थिती होती. महाराजांच्या फोटोला फुल वाहले. एका भक्ताने कसेबसे 5 मिनिट भाषण केले व 10 व्या मिनिटाला आम्ही परत जाण्यासाठी पायऱ्यांवर उभे होतो.

जो कार्यक्रमात पाच मिनिटंच पण पोटतिडकिनं बोलला होता; त्या तरुणाशी पायरीवर बोलण्याचा योग आला. आता ही तो या अगदी छोट्याशा कार्यक्रमाबद्दल खट्टु होता. मला पण हे सगळं अनपेक्षित होतं. त्यांच्याशी चर्चा करताना मी माझं मत व्यक्त केलं होतं. आपण मराठी मंडळीनी आपल्या राजाचं कार्य. त्यांच्या शौर्याबरोबर नि:स्पृहता, लोककल्याणकारी नेतृत्व, स्त्रियांप्रति आदर व काळजी, उपलब्ध बळाचा चतुराईने व कौशल्याने दिलेला त्यावेळच्या शक्तींशी लढा अशा अमराठी जनांना माहिती नसलेल्या अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत न्यावयास हव्यात. मराठी माणसाला तर सर्व माहिती आहे. परंतु असं कार्य देशाच्या राजधानीमध्येही व्हायला हवं. विविध माध्यमांद्वारे या विषयावर प्रकाश टाकला गेला पाहिजे.

दिल्लीतल्या मराठी समाजातला विखुरलेपणा व त्यामुळे कदाचित कार्यक्रमासाठी असणारी नगण्य उपस्थिति ही बाब याच काळात प्रकर्षाने जाणवली. आयोजक सांगायचे 700 पत्रिका पाठवल्या. पण कार्यक्रम स्थळी अवघे 7 जणच उपस्थित. हे सर्व पाहताना फार वाईट वाटायचे. आयोजक व प्रेक्षक यांची वयं 65 च्या पलिकडे गेली आहेत, हे देखील जाणवले. आयोजक व प्रेक्षक अशा दोन्ही स्तरांवर 40 शीच्या आतला वर्ग जवळजवळ दिसतच नव्हता. पिढ्यांचं अंतर जाणवायचं. तरी या आयोजकांना नविन तंत्रज्ञानाने मदत करायला सुरुवात केली. त्यानंतरच्या एका गुढिपाडव्याला एका वेगळ्या प्रयोगाद्वारे ऊपस्थिती वाढलेली पाहिली होती.

दोन वर्षापुर्वी 'मराठा मित्र मंडळ' या वर्षपूर्वि स्थापन झालेल्या संस्थेच्या माध्यमामधून टिळक पुण्यतिथी सारखी 'शिवजयंती ' करण्याचे आम्ही ठरवले. आम्हाला या आयोजनात लक्षणीय यश मिळाले. या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिति होती. हे चित्र उभारी देणारं होतं. यानंतर "दिल्ली मराठी प्रतिष्ठान' या तरुण संस्थेच्या माध्यमातून इंडिया गेटच्या हिरवळीवर आयोजित "दिवाळी पहाट' ला; जेथे 500 खुर्च्या लावणं जास्तचं वाटत असे, तिथे 1200 पेक्षा जास्त मराठीजन ऊपस्थित होते. त्यानंतर च्या वर्षातिल कार्यक्रमात हा आकडा 3 हजार पर्यंत पोहोचला.

या पार्श्वभुमीवर आज 19 फेब्रुवारीला होणारी शिवजयंती डोळ्याचं पारणं फेडणारी असेल! खासदार संभाजिराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मावळच्या अन कोल्हापुरच्या कार्यकर्त्यांच्या काही दिवसींपासूनच्या अथक परिश्रमाला यश येऊन या वर्षात होणाऱ्या शिवजयंतीला पहिल्यांदाच भारताचे माननीय राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. दिवसभर कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. इंडियागेट व राजपथावरुन मार्गक्रमण करणारी अन जवळजवळ 5 हजार नागरिकांचा सहभाग असलेली शोभायात्रा वा मिरवणुक, त्यात सहभागी शिवकालिन कौशल्याची झलक, लेझिम व ढोल तसेच मैदानी युध्दकौशल्याचे प्रकार यांची ओळख दिल्लीकर अमराठी जनांना होणार आहे. याचि जि भव्यता ऐकतो आहे ती अनुभवतांना या दशकाच्या सुरुवातिला अनुभवलली शिवजयंती ते आजची शिवजयंती हा प्रवास आनंद देणारा आहे. हि तर फक्त सुरुवात ठरेल. येत्या प्रत्येक पुढिल वर्षात हा उत्सव उत्तरोत्तर वाढेल आणि "जाणता राजा' व त्याचि प्रजा, त्यांचे कलागुण अवघ्या जगाला ज्ञात होण्यास मदत होईल. नवोदय होवो, हीच ईच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com