अशी बोलते माझी कविता (पूर्वा म्हाळगी)

पूर्वा म्हाळगी ९८८१००७४९९
रविवार, 16 एप्रिल 2017

माझी लेक

बदलत्या ऋतूमधला
पहिला मोगऱ्याचा गजरा
तुझ्या कोवळ्या हातांनी
माझ्या हातात पडतो

आणि माझा जीव उमलतो...

घरातल्या बोलक्‍या कोपऱ्यातून
घुंगराच्या आवाजात
गत-निकास जागोजागी घुमतो

आणि माझा जीव रुणझुणतो...

कवितेच्या पुस्तकात
बुडून जातं घर
स्वप्नाळू शब्दांना उचलत तू म्हणतेस ः
‘कित्ती सुंदर ओळ’

अन्‌ माझा जीव मोरपीस होतो...

आरशात डोकावतात
केसामधले चंदेरी क्षण
डोळ्यांखालची काळी वर्तुळं
कवितेच्या शब्दाशी
अडखळतं मन

माझी लेक

बदलत्या ऋतूमधला
पहिला मोगऱ्याचा गजरा
तुझ्या कोवळ्या हातांनी
माझ्या हातात पडतो

आणि माझा जीव उमलतो...

घरातल्या बोलक्‍या कोपऱ्यातून
घुंगराच्या आवाजात
गत-निकास जागोजागी घुमतो

आणि माझा जीव रुणझुणतो...

कवितेच्या पुस्तकात
बुडून जातं घर
स्वप्नाळू शब्दांना उचलत तू म्हणतेस ः
‘कित्ती सुंदर ओळ’

अन्‌ माझा जीव मोरपीस होतो...

आरशात डोकावतात
केसामधले चंदेरी क्षण
डोळ्यांखालची काळी वर्तुळं
कवितेच्या शब्दाशी
अडखळतं मन

आणि माझा जीव तुझ्यात नवाकोरा सापडतो...!