तांदूळ गैरव्यवहारात महाव्यवस्थापकांसह चौघे निलंबित

शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016

नाशिक - आदिवासी विकास विभागाने खरेदी केलेल्या तांदळाची भरडाई, तसेच नोकर भरतीतील गैरव्यवहारप्रकरणी आज महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांसह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले. या कालावधीत त्यांनी कार्यालयात न येता चौकशीस सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना आज (ता. 1)पासून पदावरून मुक्त करण्याचे आदेशात म्हटले आहे.

निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांत मांदळे यांसह उपव्यवस्थापक एम. एल. खंबाईत, लेखा अधिकारी किरण चव्हाण, कनिष्ठ सहायक महेश वळवी यांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागात करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या थेट भरतीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संबंधित भरतीत परीक्षेची कार्यवाही, गुण निश्‍चिती, मुलाखत, तसेच सदोष निवड यादी तयार करणे व अंतिम नियुक्ती पत्र देताना सदोष व अपात्र उमेदवारांची निवड करणे आदी मुद्दे समाविष्ट आहेत. याप्रकरणी बचाव करण्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी निलंबन व चौकशीऐवजी मांदळे यांची नागपूरला गोंडवण प्रकल्पात बदली केली होती.
या भरतीविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. विशेषतः नियुक्ती देताना मुलाखतीचा पत्ता, उमेदवाराचा मूळ पत्ता व नियुक्ती पत्र देण्याचा पत्ता तिन्ही भिन्न नमूद केले होते. प्रत्यक्षात बहुतांश उमेदवार सटाणा येथील होते व सटाण्यातील एका शासकीय कंत्राटदाराने त्यात भूमिका बजावल्याचे बोलले जाते. अंतिम निवड यादी जाहीर करताना त्यात तीन वेळा बदल केले होते. अनेक अनुभवी अधिकारी पात्र असताना त्यांना पदोन्नती न देता थेट व घाईत भरती केल्याने त्याबाबत मोठ्या तक्रारी झाल्या होत्या. तांदूळ भरडाईतही असाच गैरव्यवहार झाला होता. त्याविषयी "सकाळ‘च्या एसआयटी टीमने सविस्तर वार्तांकन केले

Web Title: Rice business authority suspended