अशी बोलते माझी कविता (संयोजिता बापट)

संयोजिता बापट, काटोल (जि. नागपूर) ९७६७५९२८२०
रविवार, 26 मार्च 2017

चाफेकळी !

- मेंदीचा सुकलेला रंग
नि मधून मधून डोकावणारे पांढरे केस
देताहेत
उतरत्या वयाची सूचना
हल्ली हल्लीच चेहऱ्यावर पडलेल्या
वेड्यावाकड्या पायवाटेसारख्या सुरकुत्यांना

मात्र, त्या सुरकुत्यांकडं
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती चेहऱ्यावर फिरवते
पावडर-लालीचे दोन हात जास्तीचेच
डोळ्यातले काजळयुक्त अनुभवी भाव
घेतात वलयाकार
नुकत्याच तारुण्यात आलेल्या किशोरीसारखे

चाफेकळी !

- मेंदीचा सुकलेला रंग
नि मधून मधून डोकावणारे पांढरे केस
देताहेत
उतरत्या वयाची सूचना
हल्ली हल्लीच चेहऱ्यावर पडलेल्या
वेड्यावाकड्या पायवाटेसारख्या सुरकुत्यांना

मात्र, त्या सुरकुत्यांकडं
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ती चेहऱ्यावर फिरवते
पावडर-लालीचे दोन हात जास्तीचेच
डोळ्यातले काजळयुक्त अनुभवी भाव
घेतात वलयाकार
नुकत्याच तारुण्यात आलेल्या किशोरीसारखे

डोळ्यांखालची काळी वर्तुळं
आवर्जून लक्षात आणून देतो आरसा
पण नाहीच जुमानत त्याला
मनातली नवयौवना
ती डोकावतच राहते त्याच्यात स्वच्छंदपणे
पुनःपुन्हा

तेवढ्यात पडतेच तिची नजर
त्या टांगलेल्या पिशवीवर
जिच्यात ठेवलेले असतात
दुखऱ्या गुडघ्यांचे रिपोर्ट्‌स
तरीही सज्ज होऊन
सर्रकन्‌ जाते ती अंगणात
दरवळणाऱ्या उदबत्तीच्या सुगंधासारखी !

एवढी वर्षं संसार सुरळीत सांभाळल्याचं समाधान बाळगत
ती उभी राहते दारात
संध्याकाळी कामावरून घरी येणाऱ्या
नवऱ्याच्या स्वागतासाठी
हसणाऱ्या, डोलणाऱ्या तरतरीत चाफेकळीसारखी !

टॅग्स