समन्वय ठेवल्यास गारगोटीतून रोजगार निर्मिती!

gargoti museum nashik
gargoti museum nashikesakal

लेखक - के. सी. पांडे

माझ्या आगळ्या वेगळ्या छंदाबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत असे. जेव्हा मी माझ्या छंदास व्यवसायाचे स्वरूप द्यायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या लक्षात आले की हे क्षेत्र अत्यंत विस्तृत व असंघटित आहे. या क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सकारात्मक प्रतिसाद दर्शविण्याची गरज आहे. भूगर्भातील गारगोटी ही अंदाजे लाखो वर्षांपूर्वीची आहे. गारगोटीचा व्यापार करीत असताना शासनाच्या निरनिराळ्या विभागांशी सतत संपर्क येतो. वाहतूक, खनिज, महसूल या शासनाच्या विभागांचा एकमेकांशी समन्वय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मला गेल्या अनेक वर्षांत जाणवले आहे. आपली धरोहर समजून या सर्व विभागांनी व्यापक व उदारमतवादी धोरण गारगोटी संदर्भात अवलंबिले पाहिजे. अशा प्रकारचा समन्वय साधल्यास मोठी क्रांती या क्षेत्रात घडू शकते. देशभरात गारगोटीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. जगाच्या पटलावर भारताचे नाव गारगोटीप्रमाणे चमकण्याची क्षमता या क्षेत्रात आहे.

gargoti museum nashik
मानवी पुस्तकांचे ग्रंथालय

नौदलात कार्यरत असताना माझा गारगोटी संग्रहाचा छंद मी जोपासल, वाढविला. मी पूर्णपणे या व्यवसायाला समर्पित झालो. केवळ आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात व जगातही प्रत्येक ठिकाणची भौगोलिक रचना निरनिराळी आहे. त्यामुळे भूगर्भातून मिळणारे मिनरल म्हणजेच गारगोटी ही निश्चितच वेगळी असणार ही खात्री मला होती. यासाठी मी परदेशात जाण्याचे ठरविले व तेथील बाजारपेठेत आपल्या गारगोटीला चांगली किंमत मिळेल, हे मला निश्चित माहित होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर मी पुढच्याच महिन्यात अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला. पण सुरुवातीला तो नाकारला गेला. अमेरिकेत जाण्यासाठी अनेक बाबींची पूर्तता करावी लागत होती. अनेक निकष देखील कडक होते. आपण कोणत्या संदर्भात अमेरिकेत जात आहोत. आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे, हा व्यवसाय अमेरिकेत आहे की नाही, अशा बऱ्याच बाबी अमेरिकेतील प्रशासनाला पटवुन द्याव्या लागत होत्या. अर्थात ही माहिती आपल्या मार्फत आपले शासन देत असते. पण तेथेही समन्वयाचा अभाव असल्याने शासन दरबारीही अनेक अडचणी निर्माण झाल्या. पुन्हा सर्व कागदपत्रांची नव्याने पूर्तता करून मी अमेरिकेत गेलो. तुशान येथे मिनरलचे एक्झिबिशन होते. तेथे मी भारताच्या मातीतून जन्म घेतलेली गारगोटी सादर केली. पहिल्याच सादरीकरणात मी सर्वांची मनं जिंकली, आणि गारगोटीची जगभर ओळख निर्माण होण्यास तेव्हापासून सुरुवात झाली.

esakal
gargoti museum nashik
विचारवाही प्रतिमासृष्टी

त्याकाळी मी तेथे साधारण दोन महिने होतो. त्यानंतर पुन्हा मायदेशात आलो. त्यानंतर देशासह जगभरात संपर्क निर्माण करून मी हा व्यवसाय वाढविण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानात प्रामुख्याने डिजिटल व इंटरनेट त्यावेळी फारसे विकसित नव्हते. त्यामुळे सगळे गारगोटीचे दगड प्रत्यक्ष घेऊन जात जगभर प्रवास करावा लागत असे. त्यामुळे प्रत्येक दगडाचे वजन त्याच्या आकारमानानुसार कमी व अधिक अनेक किलोपर्यंत असे. पर्यायाने जागतिक प्रवास अत्यंत जिकरीचा व आव्हानात्मक असे. अमेरिकेत माझा प्रवास पुढेपुढे नियमित होऊ लागला. त्याच बरोबर युरोपमधील स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बँकॉक, हाँगकाँग, न्युझीलंड, स्वित्झर्लंड व बेल्जियम या देशांनाही मी व्यवसायानिमित्त भेट दिली. तेथेही गारगोटीबद्दलचे महत्त्व तिचे सौंदर्य तिच्यातील वेगळेपण तेथील बाजारपेठेत मी पटवून दिले व त्यात यशस्वी ठरलो. प्रत्येक देशात प्रवास करताना तेथील भौगोलिक परिस्थिती तेथील आचार, विचार, संस्कृती त्या परिस्थितीशी जुळवून घेत असताना मी आपल्या भारतीय संस्कृतीची कास कधीही सोडली नाही. या व्यवसायात मला जगभर ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी मला अनेक प्रश्न माझ्या अवतीभवतीच्या घटकांकडून प्रश्न विचारले गेले. कुणाला यावर विश्वास बसत नव्हता, की एका दगडाच्या माध्यमातून जगभर व्यवसाय कसा करता येऊ शकतो. मला मिळालेल्या यशाबद्दल अनेकांच्या मनात शंका व अविश्वास निर्माण होऊ लागला होता. पण माझे ध्येय मात्र निश्चित होते.

esakal

मी त्यापासून डगमगलो नाही. मी माझे मार्गक्रमण अविरतपणे सुरू ठेवले. सर्व गारगोटी एकाच छताखाली आणून एक वैश्विक दर्जाचे संग्रहालय उभं करण्याची कल्पना माझ्या मनात आली की जेणेकरून जगभरातील सर्व गारगोटी मिनरल एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. हा उद्देश माझ्या मनात होता आणि त्यादृष्टीने वाटचाल करण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान वाटचालीत माझे तिन्ही आपत्य निवेदिता सेंट फिलोमिना व कुलीन व धवल बार्न्सस्कूल देवळाली येथे शिक्षण घेत होते. त्यांचे शिक्षण त्यांच्यावर योग्य संस्कार घडविण्यात मी व माझी पत्नी नीरा यशस्वी ठरलो. हा प्रवास पुढे जगभर सुरु राहिला.

(लेखक सिन्नर स्थित गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com