अशी बोलते माझी कविता (शुभदा दीक्षित)

शुभदा दीक्षित, पुणे (९८८१० ६२११५)
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

पैल नेते वाट...

मूक झाले शब्द माझे
स्तब्धल्या संवेदना
मौन झाल्या भावनाही
सुन्न झाल्या चेतना

सूर जरि हा वेदनेचा
खोल हृदयी गोठला
जीवनाच्या भैरवीचा
षड्‌ज आता लागला!

तृप्त झालो...जाउ द्या मज
ढाळता का आसवे?
या निरोपाच्या क्षणाला
हासू असो तुमच्यासवे

पैल नेते वाट मज जी
देखणी आहे किती
मजपुढे साक्षात मृत्यू...
भासतो सुंदर अती! 

पैल नेते वाट...

मूक झाले शब्द माझे
स्तब्धल्या संवेदना
मौन झाल्या भावनाही
सुन्न झाल्या चेतना

सूर जरि हा वेदनेचा
खोल हृदयी गोठला
जीवनाच्या भैरवीचा
षड्‌ज आता लागला!

तृप्त झालो...जाउ द्या मज
ढाळता का आसवे?
या निरोपाच्या क्षणाला
हासू असो तुमच्यासवे

पैल नेते वाट मज जी
देखणी आहे किती
मजपुढे साक्षात मृत्यू...
भासतो सुंदर अती! 

सप्तरंग

काँग्रेसवर केवळ भाजपला पर्याय देण्याची जबाबदारी नाही, तर या देशात बहुपक्षीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे आव्हान या पक्षाला स्वीकारावे...

09.03 AM

डोकलममध्ये रस्ता बांधण्याच्या उद्देशाने 16 जून रोजी चीनने घुसखोरी केली व ती ध्यानात येताच भारतीय सेनेने तेथे जाऊन त्यांना रोखून...

08.00 AM

हबल या दुर्बिणीनं अवकाशसंशोधनात खूप मोलाची भूमिका बजावली. आता तिच्या पुढची आणि कित्येक बाबतींत सरस अशी जेम्स वेब दुर्बीण आकाराला...

रविवार, 20 ऑगस्ट 2017