भारतीय मृदा विज्ञान संस्था (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 9 एप्रिल 2017

मध्य प्रदेशात भोपाळ इथं शेतीसंदर्भात केवळ मातीवर शास्त्रीय संशोधन करणारी भारतीय मृदा विज्ञान संस्था (आयआयएसएस) सन १९८८ मध्ये स्थापन झालेली आहे. भारतीय कृषी परिषदेच्या अंतर्गत या संस्थेचं कार्य चालतं. पर्यावरणरक्षण करत मातीची (मृदा) गुणवत्ता वाढवण्यासाठी पायाभूत आणि धोरणात्मक संशोधन करणं या मुख्य उद्देशाबरोबरच शेतकरी आणि शेतीसंबंधी धारकांसाठी मृदेबाबत निर्माण झालेल्या प्रश्‍नांचे निराकरण करणंही या संस्थेचं कार्य आहे.

उद्दिष्ट-कार्याच्या अनुषंगानं या संस्थेत मृदा-आरोग्य, संकलित पोषक तत्त्वं व्यवस्थापन, सूक्ष्मजैविकता, जनुकीय तपासणी, वातावरणीय बदल, मृदाप्रदूषण व उपाय, पर्यावरणीय सुरक्षा, मृदा-संधारण आदी संशोधनाचे व उपक्रमांचे विषय आहेत. संशोधनासाठी व उपक्रमांसाठी मृदाविज्ञान, मृदारसायनशास्त्र व सुपीकता, मृदाजैवविज्ञान, पर्यावरणीय मृदाशास्त्र, तसंच दूरस्थसंवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) असे प्रयोगशाळा व संशोधन विभाग आहेत. याचबरोबर कृषी माहिती व्यवस्थापन व मूलभूत विकास यासाठी उपविभाग आहेत.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अन्य संस्थांच्या सहकार्यानं दीर्घकालीन सुपीकता प्रयोग, मृदातपासणी, पीकप्रतिसाद, भारतीय जैवविविधता, अन्न व पोषक आहारसुरक्षा यांसारख्या विषयांमध्ये विशेष संशोधन प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांसाठी भारतभर विविध ठिकाणी कार्यक्षेत्रांची निवड करण्यात आलेली आहे. संस्थेकडून विकसित झालेली माहिती आणि तंत्रज्ञान उपयोगकर्त्यापर्यंत पोचण्यासाठी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असते, तसंच संस्थेकडून संशोधनासंदर्भात वार्षिक अहवाल, वार्तापत्रं प्रसिद्ध केली जातात. आयआयएसएसनं भविष्याचा वेध गेत पुढच्या २५ वर्षांत भारतीय शेतीसाठी मृदेची गुणवत्ता वाढवण्यासाठी खास धोरणात्मक उपक्रम आखले आहेत. या उपक्रमांचे खास प्रकल्प अहवाल ‘व्हिजन २०३०’ आणि ‘व्हिजन २०५०’ या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचावा, यासाठी शेतीशी संबंधित तज्ज्ञांसाठी आयआयएसएसकडून व्यावसायिक धर्तीवर प्रशिक्षण देणं, सल्ला-मार्गदर्शन देणं, तसेच लघुसंशोधन प्रकल्प राबवणं आदी विशेष कार्यक्रम आखले जातात. आयआयएसएसमध्ये शेतीशास्त्र व संबंधित विज्ञान-तंत्रज्ञान शाखांमधली पदवी व त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी संशोधक आणि तंत्रज्ञांच्या संधी उपलब्ध असतात. यासाठीही संस्थेचा खास विभाग आहे.

भारतीय मृदा विज्ञान संस्था
नबी बाग, बैरसिया मार्ग, भोपाळ - ४६२ ०३८
दूरध्वनी ः (०७५५) २७३०९७०
संकेतस्थळ ः www.iiss.nic.in

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang