प्रदुषणमुक्तीसाठी हवे उर्जा संवर्धन

प्रदुषणमुक्तीसाठी हवे उर्जा संवर्धन

वीजेची मागणी आणि पुरवठा यातील तफावत त्याबरोबरच ऊर्जेचे वहन आणि वितरण यामधील वाया जाणे यामुळे ऊर्जेचा पुरेपूर वापर होत नाही. आज आपल्या भारतात विजेच्या एकूण निर्मितीच्या जवळजवळ आपणास 9 ते 15 टक्के एवढी वीज कमी पडते आहे. यामध्ये एकूण वीजनिर्मितीपैकी 40 टक्के एवढी ऊर्जा आैद्योगिक कारखान्यांना लागते. घरगुती वापरासाठी सुमारे 22 टक्के शेतीसाठी 18 टक्के व व्यापारी कारणांसाठी अंदाजे 20 टक्के एवढी वीज वापरली जाते. 

आपल्या भारतात सुमारे 19 ते 23 टक्के एवढी वीज वाया जाते. यामध्ये प्रामुख्याने वहन, वितरणातील होणारा तोटा, वीज चोरी अधिक कार्यत्रमतेच्या उपकरणांचा न होणारा वापर ही प्रमुख कारणे आहेत. आपल्या शेजारील चीनमध्ये फक्त पाच टक्के एवढीच उर्जा वाया जाते. माजी राष्ट्रपती एपीजी अब्द्दुल कलाम यांनी 2020 पर्यंत ऊर्जेबाबत सार्वभाैम होऊ अशा पद्धतीचे उद्दिष्ठ ठेवले असल्याचे सांगितले होते. यामध्ये आपण एक सामान्य माणूस म्हणून सहभागी होऊ शकतो. 

यासाठी आपल्या घरगुती वापरात एलईडीचे दिवे वापरणे, सोलर एनर्जीचा जास्तीत जास्त वापर, पाणी गरम करण्यासाठी सोलर वाॅटर हिटरचा वापर, बीईई मानांकित पाच स्टार असणारी विद्युत उपकरणे यांचा वापर करणे. आता महावितरण कंपनीने नेट मिटरिंग ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये आपण घराच्या छतावरती सोलर पॅनेल बसवून बॅटरीशिवाय विजेची निर्मिती करू शकतो. निर्माण झालेली वीज ही आपण दैनंदिन व्यवहारात वापरू शकतो. अतिरिक्त वीज ही महावितरण कंपनीला विकू शकतो. यामध्ये होणारे वजा अधीक बिल नेट मिटरिंगद्वारे मिळते. यामुळे काही ग्राहकांचे बील जवळजवळ शुन्यावर आले आहे. 

यामध्ये मुख्यतः वीज निर्मितीला लागणाऱ्या कोळशाची बचत होणार आहे. भारतात कोळशाद्वारे सुमारे 60 टक्के वीजेची निर्मिती होते. त्यामुळे होणारे प्रदुषण व संपत चाललेल्या कोळशाचा साठा यावर नियंत्रण आणणे सोपे होईल. 

सोलर सारख्या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत्रांचा वापर हीच येथून पुढे काळाची गरज आहे. याद्वारे आपण राष्ट्रीय खनिज संपत्ती वाचवणेसाठी हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. एक युनिट ऊर्जेची बचत ही दोन युनिट ऊर्जा निर्मिती बरोबर आहे. 

(लेखक विद्युत सल्लागार आणि विद्युत लेखापरिक्षक आहेत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com