अशी बोलते माझी कविता (विश्वास गांगुर्डे)

विश्वास गांगुर्डे, ९४२२३२३२६४
रविवार, 9 एप्रिल 2017

बाबा

हा महासागर...
सरितेची सारी संकटं
अंतरात सामावणारा
अत्यंत खोल खोल...
मनाचा थांग लागू न देणारा
पर्वतप्राय लाटांनी
प्रस्थापित सृष्टीही
होत्याची नव्हती करण्याची
क्षमता बाळगणारा
किनाऱ्यावरच्या
वालुकेवर अन्‌ खडकांवर
फेनधवल लहरी उधळणारा
निळ्याभोर
शांततेची चादर
क्षितिजापर्यंत पांघरणारा
कित्येक
अनमोल मोती अन्‌ रत्नं
अंतरात बाळगणारा...

बाबा

हा महासागर...
सरितेची सारी संकटं
अंतरात सामावणारा
अत्यंत खोल खोल...
मनाचा थांग लागू न देणारा
पर्वतप्राय लाटांनी
प्रस्थापित सृष्टीही
होत्याची नव्हती करण्याची
क्षमता बाळगणारा
किनाऱ्यावरच्या
वालुकेवर अन्‌ खडकांवर
फेनधवल लहरी उधळणारा
निळ्याभोर
शांततेची चादर
क्षितिजापर्यंत पांघरणारा
कित्येक
अनमोल मोती अन्‌ रत्नं
अंतरात बाळगणारा...

आणि तो हिमालय
उत्तुंग उंचीचा
अगदी आभाळाला भिडणारा
धिप्पाड अन्‌ अतिभव्य
इतका की
नजरेच्या पॅनोरम्यात
न मावणारा
विश्वकल्याणासाठी
ध्यानस्थ ऋषीसारखा
शांत, धीरोदात्तपणे
तपस्या करणारा
कधी सूर्यकिरणांबरोबर
क्रीडा करताना
विविध रंगच्छटा उधळणारा
तर कधी सृष्टीच्या
विनाशासाठी घोंघावणाऱ्या
प्रचंड वेगवान वाऱ्यांना थोपवणारा...

होय,
आमचे बाबाही असेच आहेत
महासागरासारखे...!
हिमालयासारखे...!

Web Title: vishwas gangurde's poem in saptarang