साप्ताहिक राशिभविष्य (१ ऑगस्ट २०२१ ते ७ ऑगस्ट २०२१ )

अधिक आणि उणे या दोन शब्दांत पृथ्वीवरील जीवांचं जगण्याचं जीवनगणित सामावलं आहे. सुख आणि दुःख या भावना म्हणा, किंवा संकल्पना म्हणा, एकमेकांचा आश्रय घेऊनच जगत असतात.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

योगनिद्रेचा अद्वैतदिवस उजाडूदे!

अधिक आणि उणे या दोन शब्दांत पृथ्वीवरील जीवांचं जगण्याचं जीवनगणित सामावलं आहे. सुख आणि दुःख या भावना म्हणा, किंवा संकल्पना म्हणा, एकमेकांचा आश्रय घेऊनच जगत असतात. सुखाचं कमी किंवा जास्त होणं, दुःखाच्या कमी किंवा जास्त होण्यावर अवलंबून असतं, तसंच प्रकाश आणि अंधाराचं आहे. प्रकाश कमी झाला, की अंधाराचा प्रवेश होतो आणि अंधार कमी झाला, की प्रकाशाच्या किरणांचं अस्तित्व जाणवतं.

सूर्य ही पृथ्वीची आदिदेवता असल्याने सूर्याला आदित्य म्हणतात. माणूस प्रकाशात नांदतो, प्रकाश आणि अंधार, व्यक्त आणि अव्यक्त यांचं गूढ अध्यात्म अनुभवणं म्हणजेच ज्योतींची ज्योती असलेल्या ‘आदि’ आदित्याचं नित्य तेजोदर्शन घेणं होय! पृथ्वीतत्त्व हे व्यक्त आहे आणि हे व्यक्त अव्यक्ताच्या प्रकाशात, चक्क सुख-दुःखाच्या प्रकाशात लपंडाव खेळत असतं! असा हा लपंडाव संपला, की माणसाचा अद्वैतदिवस उजाडतो. यालाच अखंड जागृती किंवा योगनिद्रेतही जागं ठेवणारी जागृती म्हणतात!

मित्र हो, फलज्योतिष हे रात्रंदिवसाच्या लपंडावाचं गणित मांडणारं, अर्थातच सुख-दुःखाचं दिसणं किंवा न दिसणं अनुभवतं! सप्ताहात रवी-शनीची प्रतियुती होत आहे. रवीच्या छायेचा पुत्र असलेला शनी तिन्हीसांजसमयी बलवान असतो. शनी हा प्रकाशातच चालत असतो, त्यामुळंच तो प्रकाशाच्या छायेचा पुत्र आहे. ‘शनी’ प्रदोषसमयी शिवाराधना करतो. अर्थातच, अव्यक्ताचा अद्वैतदिवस उजाडण्यासाठी योगनिद्रा अनुभवण्याचा प्रयत्न करतो. सध्याचा मकर राशीतील शनी तिन्हीसांजसमयी सूर्यास्ताजवळ पूर्वेला उगवत राहील. त्यामुळंच सप्ताहात या प्रदोषकाळी, सध्याच्या या निकट तिन्हीसांजसमयी दीपाराधना करून, शिवपूजन करून अद्वैतप्रकाशाचा सूर्योदय पाहूया! आणि अज्ञानाचा अंधकार कायमचा घालवूया !

अनपेक्षित घटनांचाच कालखंड

मेष : सप्ताहात ग्रहांचे केंद्रप्रतियोग होत आहेत. सप्ताहात भर अनपेक्षित घटनांचाच राहील. प्रवासात, वाहतुकीत आणि चालताना आजूबाजूचं भान ठेवा. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना घरबसल्यासुद्धा लाभ होतील. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ३ व ४ हे दिवस ऑनलाइन क्‍लिक होणारे. थोरामोठ्यांकडून मोठं सहकार्य लाभेल, गुरुकृपा असेल.

महत्त्वाची कागदपत्रं जपा

वृषभ : सप्ताहात वेंधळेपणा टाळा. महत्त्वाची कागदपत्रं जपा. बुध-हर्षल योग तरुणांना उगाचच प्रेम प्रकरणात गुंतवणारा. सप्ताहात घरी वा दारी राजकारणी व्यक्ती टाळा. बाकी रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. ता. ३ व ४ हे दिवस घरात सुवार्तांचे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार वैयक्तिक सुवार्तांचा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मात्र रविवार बेरंगाचा.

आर्थिक व्यवहार जपून करा

मिथुन : ग्रहांचे केंद्रप्रतियोग प्रलोभनांत अडकवणारे. आर्थिक व्यवहार जपून करा. बाकी शुक्र - हर्षलचा योग आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक उपक्रमांतून विक्रम प्रस्थापित करणारा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना विवाहयोग.

व्यावसायिक मंदी जाईल

कर्क : ग्रहांचे केंद्रप्रतियोग अनपेक्षित घटनांतून त्रास देऊ शकतात. सर्व प्रकारांतून दक्षता बाळगा. नोकरीतील राजकारणात पडू नका. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात ताणतणावाखाली राहतील. मात्र, स्वतंत्र व्यावसायिकांना ता. ३ व ४ हे दिवस व्यावसायिक मंदी घालवतील. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विचित्र गुप्तचिंतेतून ग्रासणारा.

मनोकामना पूर्ण होतील

सिंह : उतावीळपणा टाळा. बोलबच्चन मित्रांची संगत टाळा. बाकी शुक्र-हर्षलचा योग पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ३ व ४ या दिवसांत मोठा उत्साह ठेवेल. तरुणांच्या शैक्षणिक चिंता जातील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींची ता. ४ ची कामिका एकादशी कामना पूर्ण करणारी. मात्र, शनिवारची तिन्हीसांज कलहजन्य होऊ शकते.

सकारात्मक विचारांची कास धरा

कन्या : राश्‍याधिपती बुधाचा होणारा हर्षलशी योग नैसर्गिक पाठबळ ठेवणार नाही. नेटवर्कची साथ मिळणार नाही. एखादं संशयाचं भूत त्रासदायक ठरेल. तरुणांनो, सकारात्मक विचार ठेवा. नोकरीत वरिष्ठांना सांभाळा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट यांत्रिक बिघाडाचा. सप्ताहात चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पर्यटनाचा योग!

अनपेक्षित गाठीभेटींतून लाभ

तूळ : सप्ताहात ग्रहांचं फिल्ड युद्धजन्य पार्श्‍वभूमी ठेवेल. मात्र सप्ताह कलाकारांना सुंदरच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ४ व ५ हे दिवस अनपेक्षित गाठीभेटींतून लाभदायी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे केंद्रप्रतियोग नोकरीतील सत्तासंघर्षातून खराब. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. नोकरी मिळेल.

जुन्या गुंतवणुकीतून लाभ

वृश्‍चिक : अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात जुन्या गुंतवणुकीतून लाभ. ज्येष्ठा नक्षत्रास ता. ३ व ४ हे दिवस अतिशय गतिमान राहतील. मात्र सप्ताहात प्रवासात जपा. ज्येष्ठा नक्षत्राच्या नागरिकांनी रस्त्यावर जपावं. तरुणांनी थट्टामस्करी टाळावी. सायबर फसवणूक टाळावी. सोशल मीडिया सांभाळा.

तरुणांसाठी चांगला कालखंड

धनू : सप्ताह तरुणांना चांगलंच सहकार्य करणारा. मात्र वाहनं सांभाळा, व्यसनांच्या आहारी जाऊ नका. बाकी सप्ताह वैयक्तिक छंद, उपक्रमांतून उत्तमच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अप्रतिम ग्रहांचे केंद्रप्रतियोग नवपरिणितांना वा प्रेमिकांना समज-गैरसमजातून छायाग्रस्त करतील.

खोटं बोलणं टाळाच

मकर : रवी-शनी प्रतियोगाच्या फिल्डवर परिस्थितीशी नमतं घेणं हाच उपाय होऊ शकतो. वैवाहिक जीवनात पथ्यं पाळा. घरातील तरुणांशी वाद टाळा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात अपवादात्मक घटना घडतील. काहींना शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर खराबच सप्ताह. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी खोटं बोलणं टाळावं.

राशीचा गुरू उत्तम साथ राखेल

कुंभ : ग्रहांच्या केंद्रप्रतियोगातूनही राशीचा गुरू उत्तम साथसंगत ठेवेल. त्यातच शुक्र-हर्षलचा योग ता. ३ व ४ या दिवसांत एकादशीची शुभ लक्षणं दाखवेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी वैवाहिक जीवनातून शुभसंकेताचा. मात्र सप्ताहाचा शेवट एकूणच आपल्या राशीस खर्च किंवा नुकसानीचं सावट ठेवेल. काहींना लोकापवादातून त्रास.

वागण्या-बोलण्यात पथ्यं पाळा

मीन : सप्ताहातील रवी-शनी योगाचं एक विचित्र पॅकेज सप्ताहावर अंमल करेल. घरातील वृद्धांचे प्रश्‍न सतावतील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादी कुसंगत भोवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी वागण्या- बोलण्यातील पथ्यं पाळावीत. आजचा रविवार विचित्र-विक्षिप्त व्यक्तींच्या गाठीभेटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com